नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाची अतिवृष्टी नवीन यादी आली असून यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय जरी करण्यात आलेला आहे. जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती.
ज्या प्रमाणे जुलै 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेली पिक नुकसानभरपाई शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली होती अगदी त्याच पद्धतीने सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ महिन्यामध्ये झालेल्या पिक नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील कापूस सोयाबीन मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे देखील करण्यात आले होते यानुसार अशा शेतकरी बांधवाना आता लवकरच त्याच्या बँक खात्यावर नुकसानभरपाई रक्कम जमा केली जाणार आहे.
आणखी कामाची माहिती सौर ऊर्जेसाठी शेती भाड्याने द्या आणि 30 हजार कमवा
अतिवृष्टी नवीन यादी
अ.क्र. | बाब | प्रचलित दर | मदतीचे वाढीव दर |
1 | जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मिळणारी मदत | मदत ६८०० (सहा हजार आठशे प्रति हेक्टर) दोन हेक्टर च्या मर्यादेत | १३६०० प्रती हेक्टर, ३ हेक्टरच्या मर्यादेत |
2 | बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मिळणारी मदत | १३५०० प्रती हेक्टर २ हेक्टरच्या मर्यादेत | २७,००० प्रती हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित |
3 | बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मिळणारी मदत | १८००० प्रती हेक्टर २ हेक्टरच्या मर्यादेत | ३६,००० प्रती हेक्टर ३ हेक्टर च्या मर्यादित |
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ अतिवृष्टी नुकसानभरपाई
सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण 128674.66 बाराशे श्येंशी कोटी चौऱ्यात्तर लक्ष सहासष्ट हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली.