अतिवृष्टी अनुदानचे वितरण आता अंतिम टप्प्यात आले असून आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे कोटी जमा झाले आहे व उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे प्रोसेयोजना चालू आहे.
ही अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे कोणत्या जिल्ह्यासतही आता पर्यंत किती निधी वितरित करण्यात आला आहे त्याची माहिती यादी यामध्ये देण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यास किती निधी मिळाला आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार ही त्यामुळे हा लेख तुम्हाला पूर्ण वाचवा लागणार आहे.
अतिवृष्टी अनुदान निधी हा विविध बँकाच्या मार्फत वितरित करण्यात आला आहे व जाणून काही निधी वितरित करण्याचा आहे. चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया अतिवृष्टी अनुदानासंदर्भात संपूर्ण माहिती.
आणखी कामाची योजना ठिबक अनुदान योजना 90 टक्के मिळणर अनुदान करा अर्ज
शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे कोटी जमा
बाधित शेतकरी व हाती पडलेले अनुदान यादी पहा
तालुका | शेतकरी | अनुदान |
माहुर | ५ हजार ७०४ | ७ कोटी १६ लाख ७६ हजार रुपये |
किनवट | १८ हजार २१ | २१ कोटी १२ लाख ९ हजार |
हिमायतनगर | ५ हजार ९७९ | ७ कोटी ६४ लाख ११ हजार |
हदगाव | २४ हजार २८१ | ३० कोटी ८७ लाख १९ हजार |
मुदखेड | १९ हजार ४०६ | २३ कोटी ५३ लाख १५ हजार |
भोकर | १२ हजार १० | १४ कोटी ९३ लाख ७२ हजार |
उमरी | ५ हजार ६०० | ६ कोटी ८० लाख ७ हजार |
धर्माबाद | ८ हजार २८६ | ७ कोटी ४७ लाख ७४ हजार |
नायगाव | १८ हजार ९२० | १५ कोटी ८९ लाख १५ हजार |
बिलोली | १३ हजार ९२७ | १० कोटी ४९ लाख ७० हजार |
मुखेड | ५६ हजार ८०० | ४६ कोटी ९५ लाख २७ हजार |
देगलूर | १६ हजार ७६९ | १२ कोटी ७६ लाख ३० हजार |
लोहा | ४० हजार १०० | ४९ कोटी ९७ लाख ४० हजार |
कंधार | ४९ हजार ३०० | ३६ कोटी ३६ लाख ८० हजार |
नांदेड | १९ हजार ८४७ | १८ कोटी १९ लाख ४१ हजार रुपये |
अर्धापुर | १९ हजार ५५१ | २४ कोटी ४ लाख ५७ हजार रुपये |

अतिवृष्टी व महापूरमुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी शासनाने जिल्हा प्रशासनाकडे व
र्ग केलेले अनुदान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.
आता पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे कोटी एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.
त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी बँकेतून रक्कम काढली देखील आहे तर काहीनी एटीएम द्वारे पैसे काढले.
117 कोटी 50 लाख रुपये एटीएम द्वारे काढल्याची बँकेकडे नोंद आहे राज्यात यंदा अनेक वेळ अतिवृष्टी झाली.
अतिवृष्टी अनुदानाची रक्कम दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली होती परंतु राष्ट्रीयकृत बँकेत जवळपास शेतकऱ्यांचे खाते नसल्याने त्याचे पैसे जमा करण्यात आले नाही.
शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यात आले आहे.
६९१ कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात
शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर सादर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त ६९१ कोटी १५ लाख ६० हजार ६३४ रुपये तहसील यांच्याकडे वर्ग केले.
त्यानंतर सादर रक्कम ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आली रक्कम आणि शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्यक्ष पैसे हातात पडण्यास विलंब लागत आहे.
आज पर्यंत जवळपास ४९८ कोटी रुपया प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती पडले आहे.