नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत मिळणार शेळी मेंढी गाई म्हशी

जाणून घेवूयात नाविन्यपूर्ण योजना 2022 संदर्भात सविस्तर माहिती जसे कि अर्ज कोठे करावा, कागदपत्रे कोणती लागतात व कोणत्या व्यक्ती पात्र आहेत.

नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत शेळी मेंढी, गाई-म्हशी व कुक्कुटपालन या योजनांचे अर्ज सुरु झाले. तरी  नवीन अर्जदारांनी लगेच अर्ज करावे अशी सूचना देखील शासनाच्या वतीने देण्यात आलेली होती.

ज्या शेतकरी बांधवाना शेळी पालन कुक्कुटपालन दुधाळ गायी म्हशी शासकीय अनुदानावर घ्यायच्या असेल ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

सध्या मात्र वस्तुस्थिती अशी आहे कि ज्या वेबसाईटवर या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज आहे ती वेबसाईट म्हणजे http://ah.mahabms.com हे संकेतस्थळ सुरु झाले आहे पुन्हा एकदा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

आणखी कामाची योजना ट्रॅक्टर अनुदान योजना 90 टक्के मिळणार अनुदान

नाविन्यपूर्ण योजना 2022 अनुदानाचे स्वरूप कसे असेल

• ७५ टक्के अनुदान SC, ST तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना दिले जाईल.

• जे लाभार्थी खुल्या प्रवर्गातील आहेत अशा लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते.

काय आहेत योजनेच्या अटी व शर्ती

 • जो अर्जदार किंवा लाभार्थी योजनेसाठी अर्ज करू इच्छित असेल त्या अर्जदाराचे वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण असावे.
 • अर्जदाराने अर्ज सादर करताना असा मोबाईल क्रमांक सादर करावा जो कि सद्यस्थिती सुरळीत सुरु आहे. कारण योजनेच्या पुढील कार्यवाहीचे संदेश त्यावर येतात
 • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांसाठी जात सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे
 • अर्जदाराच्या राशन कार्डवर घरातील जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची नावे त्याचप्रमाणे त्या सर्वांचे आधार कार्ड नंबर, सदस्यांची संख्या अगदी व्यवस्थित भरणे आवश्यक आहे.
 • कुटुंबातील एकाच व्यक्तीस नाविन्यपूर्ण योजना 2022  योजनेचा लाभ घेता येईल.
 • माहिती पूर्णतः खरी असावी माहिती अचूक व खोटी आढळून आल्यास निवड रद्द केली जाते हि बाब अर्जदाराने कसोसीने लक्षात ठेवावी.
 • तर अशा पद्धतीने आपण नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत शेळी मेंढी, कुक्कुटपालन व दुधाळ गायींसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

कोठे कराल योजनेसाठी अर्ज   

नाविन्यपूर्ण योजना 2022 साठी वरती सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करता येतो. हा अर्ज स्मार्ट फोनवरून देखील करता येतो.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे

 • शेळी मेंढी गट – १० शेळ्या व १ बोकड किंवा १० मेंढ्या व १ मेंढा.
 • दुधाळ गाई म्हशीचे वाटप.
 • ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाचा २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे.
 • १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे.
 • एकदिवसीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे.

2 thoughts on “नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत मिळणार शेळी मेंढी गाई म्हशी”

Leave a comment