नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मधमाशी पालन अनुदान योजना अंतर्गत ५० टक्के अनुदान मिळणार आहे त्यासाठी अर्ज करणे सुरू आहे.
मध केंद्र योजनेंतर्गत होतकरू शेतकऱ्यांना मधमशा पालनासाठी मोफत प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी ५० टक्के अनुदान दिले जाते.
अनेक वर्षापासून ही योजना सुरू आहे परंतु शेतकऱ्यांना या योजनेची पुरेशी माहिती नसल्याने शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन खादी व ग्राम उद्योग मंडळाने केले आहे.
चला तर या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
आणखी कामाची योजना नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत मिळणार शेळी मेंढी गाई म्हशी
मधमाशी पालन अनुदान योजनेच्या अटी
- मधमाशी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी हा शेतकरी असावा.
- त्याच्याकडे शेतजमीन असावी.
- लाभार्थी सातवी वर्ग उत्तीर्ण असावा.
योजनेसाठी अर्ज करणे झाले सुरू
मधमाशी पालन अनुदान योजना साठी अर्ज करणे सुरू झाले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खादी व ग्राम उद्योग मंडळ यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे.
मधमाशी पालन अनुदान योजनेतर्गत शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण आणि ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील डोंगराळ व जंगल भागातील मधमाशी पालकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महामंडळातर्फे मध उद्योग विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहे मधमाशी पालन हा पूरक व्यवसाय असून त्यासाठी भांडवलही कमी लागते.
प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवा असे आवाहन जिल्हा ग्रामउद्योग विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अर्ज कुठे कराल ?
महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात ऑफलाइन अर्ज उपलब्ध असतात. तो अर्ज चंगल्या अक्षरात व योग्य कागदपत्रासोबत दाखल करावा.
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा
प्रशिक्षण मोफत मिळणार
मधमाशी पालन प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या वैयक्तिक अर्जदारांना महामंडळाच्या मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रात दहा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रगतशील मधमाशी पालन किंवा संस्थेच्या संभासदास २० दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते.
या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्यातून त्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे या दरम्यान संबधित विभागाकडून या योजनेची जनजागृती करण्यात येत आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे विभागाच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे .