अतिवृष्टी नुकसान भरपाई होणार जमा च्या याद्या जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाल्या असून नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे या याद्या सध्या प्रशासनाकडे आहे त्या लवकरच प्रकाशित होणार आहे.
राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टी चा सामना करावा लागला यातून अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते काही शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई देखील मिळाली.
परंतु अजूनही काही जिल्ह्यातील किंवा काही तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही
ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना काळजी करण्याचे कारण नाही.
त्यांना देखील नुकसान भरपाई मिळणार आहे परंतु या प्रक्रियेला थोडा विलंब होऊ शकतो.
अतिवृष्टी नुकसान भरपाई होणार जमा याद्या प्रकाशित
अतिवृष्टीने बाधित झालेल्या तालुक्यातील 84 पैकी 59 गावामधील 12 हजार 86 शेतकऱ्यांची नवीन प्रणालीद्वारे यादी मदतीचे वितरण करण्यासाठी तालुका प्रशासनाने जिल्हा अधिकारी कार्यालयास सादर केली आहे.
खरीप हंगामात सोयगाव तालुक्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले या शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे.
या परतीच्या पावसाने 36 हजार 700 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याने या नुकसानीचे पंचनामे करून
जिल्हा अधिकारी कार्यालयात सादर केल्यानंतर राज्य शासनांमर्फत तालुक्यासाठी 49 कोटी 59 लक्ष 64 हजार रुपयाचा निधी मंजूर झालेल्या आहे.
मंजूर निधीनुसार तालुका प्रशासनाच्या वतीने जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयास यद्याही पाठवण्यात आल्या होत्या.
परंतु राज्य शासनाने निधी वितरणाची प्रक्रिया बदलल्याने नव्या प्रणालीत बाधित शेतकऱ्यांच्या यद्याची मागणी करण्यात आली होती.
या प्रक्रियेला वेळ लागत असला तरी तालुका प्रशासनाने मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार कार्ड संलग्न करून
59 गावामधील 16 हजार 460 हेक्टर जमिनीवरील 12 हजार 86 शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आल्या आहे.
22 कोटी 25 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा
पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 12 हजार 86 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 22 कोटी 25 लक्ष 41 हजार रुपये वर्ग करण्यात येणार आहे.
या यद्यांची पडताळणी होताच सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर औरंगाबाद येथून महा आयटीकडून वर्ग होणार आहे.
उर्वरील 25 गावामधील बाधित शेतकऱ्यांच्या यद्याही प्रकाशित करण्याचे काम वेळाने सुरू असल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा