कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते त्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचे दोनशे कोटी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया.
कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो त्यानंतर शेतकऱ्यांना कृषी यंत्रणे व अवजारे खरीदेसाठी अनुदान दिले जाते.
आता ज्या शेतकऱ्यांनी या योजनसाठी अर्ज केले आहे त्यांच्या त्यांच्या खात्यावर येत्या दोन महिन्यात 200 कोटी जमा होण्याची शक्यता आहे.
त्यासाठी कृषी आयुक्तालायकडून युद्ध पातळीवर पर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
आणखी कामाची योजना लॅपटॉप अनुदान योजना अर्ज करणे सुरू असा करा अर्ज
यांत्रिकीकरणाचे दोनशे कोटी लवकरच होणार जमा
केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सध्या शेतकऱ्यांसाठी यंत्रे व अवजारांसाठी अनुदान दिले जात आहे.
याशिवाय राज्य शासनही यांत्रिकीकरणसाठी स्वतंत्रपणे योजना राबवत आहे कृषी विभागाकडून सध्या राज्यातील यांत्रिकीकरण अनुदानाचा डोज आढावा घेतला जात आहे.
सर्व जिल्ह्यामध्ये योग्य नियोजन झाल्यास 31 मार्च पर्यंत राज्यभर 200 कोटी रुपयापर्यंत निधी वाटला जाणार असल्याची शक्यता आहे.
त्याचा लाभ किमान 30 हजार शेतकऱ्यांना होणार आहे असे सांगण्यात आले आहे.
राज्याच्या कृषी यंत्रशक्तीत होणार वाढ
कृषी यांत्रिकीकरणसाठी देशात सर्वाधिक अनुदान महाराष्ट्रात वाटले जाते त्यामुळे राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण शक्तीत मोठी वाढ होणार आहे.
2019 मधील सर्वेक्षणानुसार राज्याच्या यंत्रशक्तीचे प्रमाण 1.449 किलोवाट प्रती हेक्टर होते. अद्याप नवीन सर्वेक्षण झाले नाही
परंतु 2024 आखेर या प्रमाणात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे असे अधिकाऱ्यांच्या मते सांगण्यात आले आहे.
काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देखील जमा झाली
राज्य शासनाच्या योजनेत नाव नाव आलेल्या विविध शेतकऱ्यांनी अवजारे व यंत्रणे खरेदी केल्यानंतर अनुदान दिले जाते.
अनुदान देण्यासाठी 121 कोटी रुपये मागील तीन आठवड्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यातील 101 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील करण्यात आले आहे.
यांत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातिल 52 कोटी रुपये राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील 27 कोटी रुपयाचा समावेश आहे.
यांत्रिकीकरण योजनेत सहभागी झालेल्या शेतकाऱ्यांकरिता केंद्र व राज्य शासनाने यंदा आता पर्यंत 498 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
कृषी विभागाच्या अन्य कोणत्याही योजनापेक्षा सध्या यांत्रिकीकरणाची योजना वेगाने सुरू आहे.
अधिक महितीसाठी बातमी बघा