72 गावातील शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नमस्कार शेतकरी बंधूंनो ऑक्टोबर नोव्हेंबर 2022 मध्ये अतिवृष्टी झालेल्या 72 गावातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

सोयगाव तालुक्यातील 72 गावामधील 15 हजार 800 शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न मिटला असून या शेतकऱ्यांना 20 ते 25 या कालावधीत आधार प्रमाणीकरण केल्यानंतर अनुदान मिळणार आहे.

यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 26 कोटी 14 लाख 64 हजार रुपयाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसणीचे अनुदान अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना मिळलेल नाही आता या 72 गावातील शेतकऱ्यांना या अनुदानचा लाभ होणार आहे.

आणखी कामाची माहिती Handicap Pension Scheme 2023 अपंग पेन्शन योजना

72 गावातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

सोयगाव तालुक्यातील ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात 38 हजार 560 हेक्टर वरील पिकांना तडाखा बसला होता.

याबाबतचा अहवाल तालूका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. त्यानंतर सोयगाव तालुक्यासाठी 41 कोटी 59 लाख 64 हजार रुपयाचा निधी मंजूर झाला.

परंतु शासनाने निधी वितरण पद्धतीत बदल केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मिळण्यास विलंब झाला.

त्यानंतर सोयगाव तहसील कार्यालयाच्या वतीने आपत्ति व्यवस्थापन विभागाच्या पोर्टलवर 32 हजार 980 बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या.

परंतु शासनाने अचानक वितरण पद्धतीत बदल करून निधी वितरण प्रक्रिया महा आयटी कडे दिली

त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या आधार नंबरासह याद्या अपलोड करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले.

रक्कमेत विसंगती आढळल्यास असहमतीचे बटन दाबा

आधार प्रमाणिकरणसाठी शेतकऱ्यांनी csc केंद्रावर आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, यादीमध्ये नमूद असलेला विशिष्ट क्रमांक आदि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

अनुदानाच्या रक्कमेत काही विसंगती आढळल्यास शेतकऱ्यांनी असहमतीचे बटन दाबून तक्रार करावी. असे सहसीलदार रमेश जसवंत यांनी संगितले आहे.

शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण ही सेवा मोफत असणार आहे.

त्यामुळे कोणत्याही csc केंद्रावर पैसे घेतल्यास तातडीने सोयगाव तहसील कार्यालयाकडे तक्रार करावी असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 26 कोटी

तहसील कार्यालयाच्या वतीने महाआयटीकडे 83 गावातील बाधित शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

त्यामध्ये 9 गावाच्या याद्या त्रुटिमुळे परत आल्या होत्या.

या यद्यावर काम सुरू असून 72 गावातील 15 हजार 800 शेतकऱ्यांच्या खात्यावर 26 कोटी 14 लक्ष 64 हजार एवढी रक्कम जमा होणार आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांनी 29 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत गावातील आधार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

त्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

अधिक महितीसाठी बातमी बघा

Leave a comment