PM Awas Yojana पीएम आवास योजनेतून मिळणार बहूमजली इमारत

नमस्कार मित्रांनो PM Awas Yojana पीएम आवास योजनातून आता कुटुंबीयांना बहूमजली इमारत मिळणार आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

पीएम आवास योजनेतून भारतातील प्रत्येक कुटुंबीयांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा निर्णय आहे. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे.

आता एकाच घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठी शासणे निर्णय जाहीर केला आहे.

देशातील अनेक नागरिकांनी आतापर्यंत पीएम आवास योजणेचा लाभ घेतलेला आहे आणि अजून अनेक नागरिकांना लाभ दिला जात आहे.

PM Awas Yojana पीएम आवास योजनेतून मिळणार घरकुल योजनेचा लाभ

केंद्र सरकारकडून प्रत्येकाला घर हे ध्येय समोर ठेवण्यात आले असून PM awas yojana प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत त्यासाठी अर्थसहाय्य पुरविण्यात येत आहे.

घर घेऊ इच्छिणाऱ्या किंवा ते बंधु इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी या योजनेतील अर्थसहाय्यमुळे दिलासा मिळत आहे.

शहरी भागात घर बाधणाऱ्यांसाठी आता ही योजना अधिक सुलभ करण्यात आली आहे यामुळे शहरी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

शहरी भागात ज्या कुटुंबाची जागा आहे आशा जागेवर कुटुंबाची बहूमजली इमारत बांधण्याची परवानगी गृहनिर्माण विभागाने दिली आहे.

आता पर्यंत कुटुंबातील एकाच व्यक्तीला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येत होता. मात्र आता अन्य पात्र लाभार्थीना या बहूमजली इमारतीतिल घरासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होईल.

आर्थिक दुर्बल घटकासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबप्रमुखच्या नावावरच संपूर्ण जागा असल्याने योजनेसाठी पात्र असूनही कुटुंबातील अन्य व्यक्तिना योजनेचा लाभ घेता येत नव्हता.

कोण असेल योजनेसाठी पात्र ?

  • लाभार्थी पाती, पत्नी व अविवाहित मुलगी/मुलगा असू शकतो.
  • लाभार्थी कडे पक्के घर नसावे.
  • पक्के घर नसल्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, बँक खाते तपशील उत्पन्नाचा दाखला.
  • एका पात्र लभार्थीला घर बांधणीसाठी किंवा नूतनीकरनासाठी 1.5 लाख रुपयापर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे.
  • यानुसार एका कुटुंबातील जितके पात्र लाभार्थी त्या प्रमाणात हे अनुदान उपलब्ध होणार आहे.
  • मैदानी भागात 70 हजार ते 1. 20 लाख, डोंगराळ प्रदेशात 1.30 लाख प्रती लाभार्थी अनुदान मिळू शकते.
  • राज्य सरकारने या योजनेतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत 3.75 लाख घरे बांधण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.
  • आता पर्यंत राज्यात तब्बल 2.49 लाख घरे बांधकामाच्या विविध टप्प्यात आहे.

पीएम आवास योजनेसाठी राज्यात शासन निर्णय जारी

पीएम आवास योजनेतून बहूमजली इमारत बांधण्यासाठी राज्यात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

ही योजना शहरी अंतर्गत बहूमजली बांधकाम करण्यास परवानगी देण्याची बाब विचारधीन होती.

केंद्राच्या सुधारणानुसार राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागणेही योजनेत सुधारणा करून याविषयीचा शासन निर्णय जारी केला आहे.

त्यामुळे सामाजिक जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बहूमजली इमारत बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment