Pannas Hajar Anudan ३१ मार्च पर्यंत खात्यात जमा होणार

नमस्कार शेतकरी बंधूंनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अजून Pannas Hajar Anudan ५० हजार अनुदानाचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान ३१ मार्च पर्यंत वाटप करण्यात येणार आहे.

Pannas Hajar Anudan वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्ताकडून बँकांना सूचना देण्यात आल्या आहे अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अजून देखील ५० हजार अनुदान योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ३१ मार्च आधी लाभ दिला जाणार आहे.

त्या संदर्भात माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे

आणखी कामाची माहिती Crop Insurance 2023 पुढील 15 दिवसात मिळणार पिक विमा

Pannas Hajar Anudan ३१ मार्च पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना या योजनेअंतर्गत कमी मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे.

येत्या 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना देण्यात आल्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य दिलीप मोहिते पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, डॉ.देवराव होळी, वैभव नाईक यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आणि प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतची सद्यस्थिती याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या

पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या 12 लाख 84 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 4683.2 कोटी रुपये

दोन लाखापर्यंत कर्ज मुक्तीचा घेतला निर्णय

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 32 लाख 3 हजार शेतकऱ्यांना 20,425.12 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून.

उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेने मोठा दिलासा दिला आहे.

अधिकृत माहिती बघा

Leave a comment