pik vima taluka list मराठवाड्यातील ६९ तालुक्यामध्ये खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ४२७ मंडळातील पिके वळून गेली होती.
या शेतकऱ्यांना पिक विम्याचे २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी विमा कंपन्यांना दिले होते.
या आदेशाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या कंपनीने गंडवले आहे pik vima taluka list
पिक विमा कंपनीसोबत शासनाने केलेल्या करारानुसार पावसाचा सलग २१ दिवस खंड असेल तर शेतकरी पिक विम्यासाठी पात्र आहेत.
जालना जिल्ह्यातील ८ ताकुल्यातील ५७ कृषी मंडळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील २० मंडळ, बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ५६ मंडळे, यासह अनेक मंडळात दुष्काळी परिस्थिती होती.
संबंधित जिल्हाधिकाऱ्यानी विमा कंपन्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांना पिक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तत्काळ वितरीत करण्याचे आदेश दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ३२ हजार 2४८ शेतकऱ्यांना ८५ कोटी २७ लाख 79 हजार रुपये दिवाळीपूर्वीच अदा करणे विमा कंपन्यांना बंधनकारक होते.
मात्र एम.एस चोलामंडळ आतापर्यंत २५ टक्के अग्रिम जमा केलेला नाही.