लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

लेक लाडकी योजना या योजनेतर्गत मुलींना एका लाखाचे अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी योजनेबाबत जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जन जागृती करण्यात येत आहे.

1 एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना टप्प्या टप्प्याने एक लाख रुपये या योजनेतर्गत दिले जाणार आहे

मुलीनाचा जन्मदर वाढवा यासाठी शासनस्तरावरून आरोग्य, शेक्षणिक यासह विविध योजना राबविण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने माझी कन्या भाग्यश्री हि योजना सुरु करण्यात आली होती या योजनेची व्य्प्ती वाढून ललेक लाडकी योजना शासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :नमो शेतकरी योजनेचा 2 हफ्ता या तारखेला होणार जमा Namo Shetkari Yojana

लेक लाडकी योजना सर्वांनी लाभ घ्यावा

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो

  • ज्या लाभार्थीला एकाच मुलगी आहे असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकता
  • ज्यांना दोन मुली आहे अशा लाभार्थींना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरीही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कागदपत्रे काय लागणार

  • मुलीचा जन्म दाखला.
  • उत्पन्नाचा दाखला.
  • राशन कार्ड
  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक
  • मतदान कार्ड.

इत्यादी कागदपत्रे लागतील.

वार्षिक उत्पन्न किती हवे

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कुटुंबांना उत्पन्न मर्यादा हि एक लाख रुपयापर्यंत असावी एका लाखापेक्षा अधिक उत्पन्न नसावे.

लाभ घेण्यसाठी अर्ज कुठे कराल

  • लेक लाकडी योजना महिला बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविकाकडे अर्ज भरून देणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत जन्म दाखल्यासह इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

कसे मिळतील पैसे

मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार, ६ वीत ७ हजार, ११ वीत ७ हजार, १८ वर्षानंतर ७५ हाजर रुपये मिळतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment