2022 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली या जिल्ह्यांना मिळणार लाभ

2022 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यातील २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी अतिवृष्टी अनुदान जमा करण्यात आले आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

सोयगाव तालुक्यामध्ये २०२२ अतिवृष्टीने नुकसान झालेल्या २३ हजार १० शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रशासनाने मदतीचे ४० कोटी १४ लाख रुपये अनुदान वर्ग केले असून 3 हजार ११ शेतकऱ्यांना मात्र विविध कारणामुळे अनुदानाची वाढ पहावी लागत आहे.

सोयगाव तालुक्यात सप्टेंबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये २६ हजार ९५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

शासनाने ऑनलाईनप्रणालीद्वारे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची पद्धत अवलंबली होती. २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी उद्भवून नुकसानीची मदत पदरात पडून घेण्यासाठी अनेकदा संबधित तलाठ्याकडे कागदपत्रे जमा करावी लागली.

2022 ची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली

सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी चे अनुदान शेतकऱ्यांना आता मिळवण्यास सुरुवात झाली आहे डिसेंबर २०२३ मध्ये हि रक्कम उपलब्ध झाल्यानतर २६ हजार 55 पैकी २३ हजार १० शेतकऱ्यांच्या खात्यावर ४० कोटी १४ लाख रुपयाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

उर्वरित 3 हजार ११ शेतकऱ्यांपैकी 1 हजार 300 शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट केले नाही तसेच त्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात निधी वर्ग झाला नाही.

1 हजार ७११ शेतकऱ्यांच्या नावात दुरुस्ती असल्याने टी यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून दुरुस्तीसाठी तहसीलच्या पोर्टलवर परत करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment