शबरी घरकुल योजना १०० टक्के मिळणार अनुदान 9 जानेवारी पर्यंत करा अर्ज

शबरी घरकुल योजना अनुसूचित जमातीसाठी या योजनेंतर्गत १०० टक्के अनुदान देण्यात येते त्यासाठी अर्ज करणे सुरु आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया.

शबरी घरकुल योजना हि अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणारी अत्यंत महात्वाची योजना आहे या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे.

अनुसूचित जमातीच्या लाभार्थीसाठी शबरी घरकुल योजनेत घरकुल मिळण्याची संधी असून ३४०० घरकुलांचे उद्दिष्ट अजूनही शिल्लक आहे.

शबरी घरकुल योजनेसाठी शासनाकडून 9 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आव्हान केले आहे त्यामुळे ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी 9 जानेवारी पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी तब्बल ५ लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कलमनुरी यांच्याकडून यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.

प्रकल्प कार्यालय किंवा पंचायत समितीत अर्ज करण्याची संधी होती ज्यांना पूर्वी लाभ मिळाला नाही व निकषात पात्र ठरतील अशांना घरकुल मंजूर होणार होते.

मात्र त्या संख्येत अनुसूचित जमातीतील लाभार्थीचे अर्जाच आले नाही त्यामुळे ३४०० घरकुलांचे उद्दिष्ट शिक्क्ल राहिले आहे आता त्यासाठी पुन्हा अर्ज मागविले जात आहे.

आतापर्यंत जवळपास दीड हजार अर्ज आले आहे मात्र अजूनही दोन हजाराचे उद्दिष्ट शिल्लक राहत असल्याने लाभार्थीना संधी आहे. 9 जानेवारी पर्यंत अर्ज केल्यास या लाभार्थीना लाभ मिळू शकणार आहे.

यंदा पुन्हा उद्दिष्ट मिळाले

  • २०२३-२४ मध्ये मंजूर पाच हजार घरकुलापैकी तूर्त १६६६ घरकुलाचे उद्दिष्ट ताकुलानाहीय वाटप करण्यात आले आहे.
  • यामध्ये ओंढा २४२, वसमत ८९, हिंगोलो ६०५, कळमनुरी ५४१, सेनगाव १८१ अशी संख्या आहे.
  • आता यापर्यंत केवळ दोन लाभार्थींना पहिला हप्ता मिळाला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment