गाई म्हशी शेळी मेंढी पालनसाठी मिळणार ७५ टक्के अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

नाविन्यपूर्ण पशुधन योजनेतून गाई म्हशी शेळी मेंढी पालनसाठी ७५ टक्के अनुदान मिळणार आहे त्यासाठी अर्ज करणे चालू आहे अनेक शेतकऱ्यांनी अर्ज देखील केलेले आहे.

पशुसंवर्धन विभागाकडून मागविण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण पशुधन योजनेसाठी बीड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले आहे.

परंतु लाभार्थी उद्दिष्टानुसार यातील २५७ जणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे

शहरातील तसेच ग्रामीण भागातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी राज्य तसेच जिल्ह्यास्तरीय नाविन्यपूर्व पशुधन वाटप योजना राबविण्यात येत आहे.

२०२१-२२ पासून २०२५-२६ पर्यंत ५ वर्षासाठी हि योजना लागू राहणार आहे जिल्ह्यास्तरीय पशुधन वाटप योजनेंतर्गत दुधाळ गाई म्हशी वाटप करणे, शेळी, मेंढी गटाचे वाटप केली जाते.

यात जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील आवश्यक गरजूंना दरवर्षी दुधाळ जनावरांचे वाटप केले जात आहे मात्र २०२३-२४ या आर्थिक वर्षात मागविण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जाची संख्या तीन हजार इतकी झाली आहे

त्यातील २५७ एवढेच लाभार्थी उद्दिष्ट असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यास्तीय नाविन्यपूर्ण पशुधन योजनेंतर्गत आगामी एक दोन दिवसात अर्जदार व उद्दिष्ट संख्या प्रसिद्ध केली जाणार आहे

दोन्ही योजनेचे ५७ हजार अर्ज आतापर्यंत दाखल झाले असून उद्दिष्टांप्रमाणे लाभार्थी हिस्सा देण्याचे काम सुरु आहे.

बातमी पहा

गाई म्हशी शेळी मेंढी पालनसाठी ७५ टक्के शासकीय अनुदान

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण पशुधन योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीसाठी ७५ टक्के तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के शासकीय अनुदान मिळते.

एका लाभार्थीला दोन गाय किंवा दोन म्हशी तसेच शेळी-मेंढी गटात १० शेळ्या एक बोकड वाटप केला जातो.

योजनेसाठी बीड जिल्ह्यातील तीन हजार शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहे.

अर्ज करण्याच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment