pik vima yojana 2024 मध्ये झाल्याने हंगामातील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सातारा, सोलापूर, लातूर, अमरावती, हिंगोली, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा सरकारच्या तांत्रिक सल्लगार समितीने फेटाळला आहे.
कृषी विभागाचे सचिव प्रमोदकुमार मेहरडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने सात जिल्ह्यातील अग्रिम पिक विमा नाकारला आहे आता या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येणार नाही. pik vima yojana 2024
पिक विमा योजना लागू करताना व अग्रिम पिक विम्यासाठी दावे दाखल करताना राज्य सरकारने केवळ पर्जन्यमानाचा विचार केला आहे.
त्यात दुष्काळी नियमावली किंवा योजनेतील अन्य मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले नसल्याचे सांगत केंद्रीय समितीने पीकविमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिला आहे
राज्यात यंदा पहिल्या टप्प्यात ४० तालुके, त्यानंतर १२४१ महसुली मंडलांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने पिके वाया गेली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर अग्रिमसाठी पीकविमा कंपन्यांकडे दावे केले होते. मात्र बहुतांश ठिकाणी कंपन्यांनी राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती. त्यानंतर अग्रिम देण्याचे आदेश देण्यात आले.