Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! 6.56 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी, लाभार्थी यादी जाहीर

Loan Waiver: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने नवीन योजना आखले आहे. काय आहे सरकारची नवीन योजना? आपण आज पाहणार आहोत.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वेळेस सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत ची सर्व कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे त्याकालीन वित्तमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची व्याप्ती वाढवली आणि ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे त्यांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयाची मात्र गेल्या सरकारला अंमलबजावणी करता आली नाही. वर्तमान सरकारने मात्र गेल्या सरकारचा निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रोत्साहन योजनेअंतर्गत 2017, 2018, 2019 यापैकी किमान दोन वर्षाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज यापूर्वी माफ झाले नव्हते, त्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती त्यावेळेस काही शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ शकली नव्हती. ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिली होती त्या सर्व शेतकऱ्यांचे आता कर्ज माफ होणार आहे.

राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यास सहा लाख 56 हजार शेतकऱ्यांना आम्ही मदत करू हे करण्यासाठी आम्ही 5800 कोटी रुपये बाजूला ठेवले आहेत. Loan Waiver

Leave a comment