खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. त्यानंतर त्या पिकाचे शासनाकडून पंचनामे करण्यात आले.

परंतु शेतकऱ्यांना याचा लाभ खूप कमी प्रमाणात मिळाला त्यामुळे शासनाने याबाबत किमान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १००० रुपये निधी मिळावे म्हणून प्रधानमंत्री फासल विमा योजनेत तरतूद करण्यात आलो होती. खरीप व रब्बी हंगामातील

ज्याप्रमाणे राज्याच्या कृषी, संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने याबबाय सोमवार दि २९ रोजी शासन निर्णय काढला आहे.

या शासन निर्णयाप्रमाणे रब्बी हंगाम २०२२-२३ आणि खरीप हंगाम २०२२ साठी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे.

राज्यामध्ये पावसाच्या सुरुवातील जोरदार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप हंगामाचा सोयाबीन, कापुसासह इतर पिकाचे मोठे नुकसान झाले.

यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान योजनेंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२२-२३ साठी ४७,५२,२६७ रूपये आणि खरीप हंगाम २०२२ साठी २,९३,९९,३१६ इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

Leave a comment