अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई

नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळणार याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २१०९ कोटी १२ लाख २ हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या महिन्यात अवेळी पाऊसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त, नागपूर, कोकण, अमरावती, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना मदत व  दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.  तसेच यापूर्वी १० जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता १४४ कोटी निधी वितरणास मान्यता दिली असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

अधिकृत माहिती पहा

नोव्हेंबर व डिसेंबर, 2023 मध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशिल
अ. क्र.जिल्हा बाधित क्षेत्र – हेक्टरबाधित शेतकरी संख्यानिधी (रु. लक्ष)
1गोंदिया12244.12282422054.49
एकूण12244.12282422054.49
विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.20.01.2024 चा प्रस्ताव
1नागपूर13479.93179363268.39
2वर्धा8.40171.23
3भंडारा8607.93208212318.75
4गोंदिया13417.96250543620.88
5चंद्रपूर19694.04396882678.38
एकूण55208.2610351611887.63
विभागीय आयुक्त, कोकण यांचा दि.23.01.2024 चा प्रस्ताव
1ठाणे157.7272633.40
2पालघर1677.677397260.05
3रायगड1191.234560163.04
4रत्नागिरी87.9236511.96
5सिंदूधुर्ग114.1463516.64
एकूण3228.6813683.00485.09
विभागीय आयुक्त, अमरावती यांचा दि.20.01.2024 चा प्रस्ताव
1अमरावती206265.8632294435795.46
2अकोला189681.6824618833296.96
3यवतमाळ36545.00844516935.25
4बुलढाणा157180.9027657522034.77
5वाशिम60250.9520385711526.63
एकूण649924.391134015109589.07
विभागीय आयुक्त, पुणे यांचा दि.17.1.2024 चा प्रस्ताव
1पुणे7863.91197271815.96
2`सातारा80.6318225.64
3सांगली16277.89315495811.23
4सोलापूर30660.92414588248.17
5कोल्हापूर16.18712.33
एकूण54899.539298715903.33
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचा दि.20.1.2024 चा प्रस्ताव
1छत्रपती संभाजीनगर148368.4126419420600.58
2जालना123091.8720721619176.93
3परभणी95053.6723178713080.59
4हिंगोली123164.4025762516786.65
5नांदेड3758.503922880.26
6बीड9.90172.19
7लातूर262.8988835.91
8धाराशिव1208.661912429.30
एकूण494918.3096756170992.41
एकूण राज्य

Leave a comment