भारतातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 36 हजार रुपये Pm Kisan Mandhan Scheme

Pm Kisan Mandhan Scheme : भारत हा शेतीप्रधान देश आहे. संपूर्ण जगात भारताची ओळख कृषीप्रधान देश म्हणूनच होते. भारताची अर्थव्यवस्था ही देखील शेतीवर आधारित आहे. हेच कारण आहे की शेती क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.

यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. 2 हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हफ्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत.

आतापर्यंत या योजनेचे 15 हफ्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले असून लवकरच सोळावा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मार्च महिन्यात या योजनेचा सोळावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

याशिवाय देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना देखील राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपयाची पेन्शन मिळते. सरकारी नोकरदारांप्रमाणे वृद्धापकाळात शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, याच योजनेबाबत केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी मोठी माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत आत्तापर्यंत 23 लाख 38 हजार 720 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. Pm Kisan Mandhan Scheme

दरम्यान या योजनेत सहभाग नोंदवलेल्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक तीन हजार रुपये अर्थातच वार्षिक 36 हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. आता आपण या योजनेचे संपूर्ण स्वरूप समजून घेणार आहोत.

कशी आहे पीएम किसान मानधन योजना ?

ही देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाकांशी पेन्शन योजना आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी बांधव नोंदणी करू शकतात.

या योजनेत सहभाग घेतल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार पैसे गुंतवावे लागतात. म्हणजेच ही शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली एक बचत योजना आहे.

या योजनेत सुरुवातीला शेतकऱ्यांना ठराविक रक्कम गुंतवावी लागते आणि यानंतर मग या योजनेतून शेतकऱ्यांचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन पुरवली जाते.

या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वयानुसार 55 ते 200 रुपयांपर्यंत प्रतिमहिना गुंतवणूक करावी लागते. वयाची 60 वर्षे पूर्ण झालीत की, मग गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना मासिक तीन हजार रुपयांची पेन्शन उपलब्ध करून दिली जाते.

Leave a comment