रमाई घरकुल योजना या योजनेंतर्गत राज्यातील नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो.
हा अर्ज कुठे करावा लागतो व किती अनुदान मिळू शकते आणि कोणत्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो त्याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
अनुसूचित जातीच्या व्यक्तींना बिटक परिस्थितीमुळे पक्के घर बंधने शक्य होत नाही त्यासाठी राज्य शासनाने रमाई घरकुल योजना सुरु केली आहे
बीड जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात २६ हजार २८५ घरकुलांना मिळाली त्यापैकी १९ हजार २४२ घरकुले पूर्ण झाली उर्वरित घरकुलांना बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान वितरीत केले जाते.
आर्थिक परिथिती बिटक असणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांना हक्काचे पक्के घर हवे असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची गरज आहे.
घरकुल बांधकामासाठी 1 लाख २० हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे तसेच मनरेगा माध्यमातून लाभार्थीस ९० दिवसाचा रोजगार उपलब्ध केला जातो तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शैचालाय बांधकामासाठी स्वतंत्र्य तरतूद करण्यात आली आहे.
रमाई घरकुल योजना काय आहे
अनुसूचित जाती नवोबोद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावले जावे त्यांच्या निवाऱ्याचा पश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये रमाई घरकुल आवास योजना २००९ ते २०१० पासून सुरु आहे.
या योजनेची अंबलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा शहरी विभागासाठी नगर परिषद, नगर पंचायत मार्फत करण्यात येते.
योजनेचे निकष व किती अनुदान मिळते
- अर्जदार महाराष्ट्रातील कायमचा रहिवासी असावा
- अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवोबोद्ध प्रवर्गातील असावा.
- प्रपत्र ड मध्ये त्याचे नाव असणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्रामध्ये त्याच्याकडे आधार कार्ड, pan कार्ड, पत्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र, ओळख प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अनुदान किती मिळते
या योजनेंतर्गत स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर २६९ चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी कच्चे घर असणाऱ्या कुटुंबांना नवीन पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते.
योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थीची निवड प्राधन्यक्रमाने केली जाते.