Crop Insurance list शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा परतावा प्राप्त होण्यास सुरुवात

Crop Insurance list अमळनेर तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधीही तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली होती.Jitendra Awhad यांच्या रामाच्या आहारावरील वक्तव्यावर Devendra Fadnavis यांची टीका | Politics

मात्र त्यात पातोंडा मंडळाची यादी स्कॅन करण्याची राहून गेल्याने या मंडळातील पाच हजार शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले होते. त्याबाबत त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे फिर्याद मांडली.

मंत्री पाटील यांनी त्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर हेक्टरी साडेआठ हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा होणे सुरू झाले आहे. पातोंडा मंडळासाठी सहा कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून, सदर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर या भागांत मात्र पीकविमा परतावा खरिपासंबंधी मिळालेला नसल्याची माहिती आहे. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत विमा कंपनी, कृषी विभागाकडे विचारणा केली, परंतु योग्य माहिती मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. Crop Insurance list

तसेच जिल्हास्तरावर विमा कंपनी, शासनाचे प्रतिनिधी, प्रशासन यांच्याकडेही निवेदन सादर केले. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने कार्यवाही होत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या बुधवारी (ता. १४) याबाबत बैठक आहे.

त्यात शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतला जावा, विमा कंपनीने शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी विमाधारक व केळी विमाधारक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे नुकतीच केली आहे.

Leave a comment