खात्यात जमा होणार 4000 राज्यातील एकूण 1 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई – केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे सामाईक मुख्यतः सुविधा केंद्रांमार्फत ई – केवासी प्रमाणिकरण करण्यासाठी 12 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आणखी 10 दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्यतेसाठी राज्यात 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांचे ई- केवायसी प्रमाणिकरण व 3 लाख 1 हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान केवळ ई – केवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ई – केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे शेतकऱ्यांनी स्वतःचे ई – केवायसी प्रणाणिकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन अँप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा.
पी. एम. किसान योजनेंतर्गत ई – केवायसी प्रमाणिकरण करणे , योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे , बँक आधार क्रमांक जोडण्यासाठी किंवा तपशील पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी खात्यासमोर हजर राहणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यांची बँक खाती आधारशी लिंक केलेली नाहीत, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार लिंक केलेली खाती उघडावीत.
केंद्र सरकारने पी.एम किसान योजनेच्या 16 वा हप्त्याचे माहे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाटप करण्यात येणार असून ज्या लाभार्थ्यांनी किसान योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल. खात्यात जमा होणार 4000
किंवा या दोन्ही योजनांच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता 21 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण कराव्यात. अशाप्रकारे आवाहन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.