राज्यातील लाखो शेतकरी पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे या शेतकऱ्यांना कोणत्या कारणामुळे पैसे मिळाले नाही याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता दिनांक २८ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला अनेक शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याचे पैसे मिळाले.
पंरतु राज्यात अजूनही असे शेतकरी आहे कि त्यांनापीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना कोणत्या कारणामुळे १६ वा हप्ता मिळालेला नाही त्याची माहिती जाणून घेऊया.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 3 लाख ४६ हजार ५५० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टप्याटप्याने २०७ कोटी ९३ लाख रुपये वर्ग करण्यात येणार आहे.
अनेक शेतकरी १६ व्या हप्त्यापासून वंचित
पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनेंतर्गत २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथून पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी २ हजार व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित ४ हजार रुपये असा एकूण ६ हजार रुपयाचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
त्यामुळे शासनाने जिल्ह्यातील 3 लाख ४६ हजार ५५० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने २०७ कोटी ९३ लाख रुपये वर्ग करण्यात येणार आहे.
मात्र ई केवायसी न झाल्याने ४ हजार ५८३ शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार असल्याची शक्यता आहे हे एका जिल्ह्यातील शेतकरी आहे अशी राज्यात शेतकऱ्यांची लाखात संख्या आहे.