रसवंती, तार कुंपण, शेळीगट व पीठ गिरणीसाठी ७५ टक्के अनुदान असा करा अर्ज Flour Mill Scheme

Flour Mill Scheme रसवंती, तार कुंपण, शेळीगट व पीठ गिरणीसाठी ७५ टक्के अनुदान मिळणार आहे त्यासाठी अर्ज करणे सुरु झाले आहे यासाठी अर्जा संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती जमातीसाठी विविध योजनासाठी अर्ज मागविण्यात आले आहे

रसवंती, तार कुंपण, शेळीगट व पीठ गिरणीसाठी ५० हजाराच्या मर्यादेत ७५ टक्के अनुदान दिले जाते किराणा दुकानासाठी हि योजना सध्या सुरु नाही २०१३-१४ च्या आधी हि योजना अस्तित्वात होती गरजेनुसार या योजनेत बदल करण्यात आला.

स्थानिक गरजा लक्षात घेऊन राज्याची हे केंद्रव्रती योजना राबविण्यात येते छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गात गरजूकडून २९ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.

या योजनेला गरजूनी चांगला प्रतिसाद दिला आहे लवकरच या अर्जाची छाननी पूर्ण होणार आहे. Flour Mill Scheme

लाभ व कागदपत्रे

अनुसूचित जमाती प्रवर्गाती महिला-पुरुषांना या योजनेचा लाभ मिळतो १८ ते ३५ वर्षे अशी वयोमर्यादा यासाठी लागू आहे.

कागदपत्रे

यामध्ये वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळी कागदपत्रे लागतात तार कुंपणासाठी सातबारा लागतो, पीठ गिरणीसाठी विजेचे बिल लागते तसेच नमुना नंबर ८ चा उतारा देखील लगतो, जातीचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला हि कागदपत्रे लागतात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment