लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे पैसे..! तुमच्या खात्यावर किती पैसे आले

राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान निधीचे पैसे जमा करण्यात आले आहे यामध्ये तुम्हाला पीएम किसान निधीचे पैसे किती मिळाले त्याची माहिती जाणून घेऊया.

पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आला

ई केवायसी, लेंड सेन्डिंग झालेल्या बीड जिल्ह्यातील 3 लाख ६५ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६ हजार रुपये प्रमाणे २१९ कोटी रुपये प्राप्त होत आहेत. टप्प्याटप्प्याने बँकेकडून संबंधितांना वितरीत केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसानचा १६ वां हप्ता वेळेत देण्यासाठी यापूर्वीच नियोजन करण्यात आले होते. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचे उर्वरित दोन हप्ते सुद्धा देण्यसाठी राज्य शासनाकडून पर्यंत केले होते.

त्यानुसार प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील कार्यक्रमातून दोन्ही योजनेतील शेतकरी लाभार्थींना निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

प्रत्येकाच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा

लोकसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता देण्यास विलंब होऊ शकतो तसेच ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष देखील संपणार आहे

या दोन्ही कारणामुळे पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे.

पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर हि रक्कम जमा होणार असल्याचे समजत आहे.

शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपले बँक खाते तपासणे आवश्यक आहे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment