राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आली आहे ती म्हणजे पिकाचे उत्पादन वाढवा आणि कमवा हजारोचे बक्षीस Pik Utpadan Bakshis या योजनेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.
या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आपल्या रब्बी पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतल्या त्यांना या बक्षिसाचा लाभ होणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे व कसा करावा लागणार आहे त्यास संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
शेतकरी आपल्या पिकाचे उत्पादन वाढावे म्हणून शेतीमध्ये अनेक प्रयोग करत असतात त्यासाठी त्यांना खूप खर्च देखील करावा लागतो.
Pik Utpadan Bakshis
या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणत होईल आशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कृषि विभागाने रब्बी हंगामसाठी पीक स्पर्धा जाहीर केली आहे.
जे शेतकरी अधिक पीक उत्पादन घेईल त्या शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत बक्षीस देण्यात येईल
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हरभरा आणि गहू या दोन पिकाचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.
आणखी कामाची योजना नाविन्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत मिळणार शेळी मेंढी गाई म्हशी
अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर शेवटची तारीख
शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेण्यासाठी आपले पीक उत्पादन वाढवा आणि 31 डिसेंबर पर्यंत आपला अर्ज सादर करून द्या.
तालुका कृषि अधिकाऱ्याकडे हा अर्ज तुम्हाला सादर करावा लागणार आहे अर्ज सादर करण्यासाठी ज्या पात्रता लागणार आहे त्या आपण खाली पाहणार आहोत.
तालुका कृषि अधिकाऱ्याकडे करा अर्ज
पीक उत्पादन वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा.
या अर्जासाठी 300 रुपये चलन स्वरूपात भरणा करणे आवश्यक आहे.
बक्षीसाचे वितरण खालीलप्रमाणे असेल
जिल्हा स्तरावर तीन बक्षिसे
- पीक उत्पादन स्पर्धेत तालुका, विभागीय आणि जिल्हा अशी त्रिस्तरिय बक्षिसे देण्यात येणार आहे. तालुक्यात प्रथम आलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.
- उपविभागीय स्थरावर प्रथम आलेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये तर जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या शेतकऱ्यांना सात हजार रुपये देण्यात येणार आहे.
राज्य स्तरावर तीन बक्षिसे
- जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रथम, दूतीय आणि तृतीय बक्षिसे या योजनेत देण्यात येईल
- जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकाऱ्यामध्ये तालुका कृषि अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात येईल.
स्पर्धेच्या अटी
- योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.
- जमीन मालकीचा पुरावा असणे आवश्यक आहे.
- स्पर्धेत भाग घेण्यासाठी 300 शुल्क भरावा लागणार आहे.
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा