Post Vibhag Vima Yojana पोस्ट विभागाकडून एक भन्नाट योजना राबविली जात आहे यामध्ये ३९९ रुपयात दहा लाखाचा विमा मिळणार आहे म्हणजेच ३९९ रुपयात मिळवा दहा लाख रुपये या संदर्भात माहिती जाणून घेऊया.
पोस्ट विभागाने सुरू केलेल्या एआयजी आणि बजाज कंपन्यांकडून विमा कवच दिले जात आहे त्यानुसार राज्यातील अनेक नागरिकांना हे सुरक्षा कवच घेतले आहे.
टपाल कार्यालयाकडून टाटा एआयजीचा ३९९ मध्ये, तर बजाज आलीयांजचा ३९६ रुपयात अपघाती विमा देण्यात येतो.
पोस्टाच्या नव्या योजनेनुसार दोन्ही कंपन्यांचा ७९५ रुपयात नागरिक एकत्रित विमा घेऊ शकणार आहे त्या बदल्यात दोन्ही कंपन्याकडून प्रत्येकी १० लाख रुपयाचे अपघाती विमा कवच देण्याची हमी देण्यात आली आहे.
आणखी कामाची योजना Handicap Pension Scheme 2023 अपंग पेन्शन योजना
Post Vibhag Vima Yojana
पोस्टाच्या या योजनेतून नागरिकांना दहा लाखाचा लाभ होणार आहे या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिक सुरक्षा कवच घेत आहे.
टपाल विभागाच्या वतीने विविध ठिकाणी शिबिरे राबवून या योजनेला गती दिली जात आहे.
टपाल विभागाच्या या योजनमध्ये आता पर्यंत अनेक नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे परंतु आता पर्यंत एकही मदतीचा प्रस्ताव आलेला नाही.
अपघात झाल्यास विमा कवच असावे म्हणून अनेकणी या योजनेत सहभाग घेतला आहे .
असे मिळतील दहा लाख रुपये
कायमचे अपंगत्व आल्यास
टाटा व बजाज विमा कंपनीच्या पॉलिसी काढल्यास कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये विमा भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
त्याचा बरोबर अपंगत्व आल्यासही दहा लाख रुपये मिळतील.
अपघातात मृत्यू झाल्यास
टाटा आणि बजाजच्या स्वातंत्र्यरित्या घेतल्या जाणाऱ्या विमा पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये मिळतील.
परंतु तुम्ही जर दोन्ही पॉलिसी जर एकत्र घेतली तर तुम्हाला दहा-दहा लाख म्हणजेच २० लाख रुपये मिळतील.
दोन्ही मिळून वर्षाला ७९५ रुपयाचा हप्ता
तुम्ही जर या दोन्ही पॉलिसी घेतल्या तर तुम्हाला वर्षाला ७९५ रुपये भरावे लागणार आहे टपाल विभागात हा विमा काढण्याची सुविधा करण्यात आली आहे.
तुम्ही टपाल विभागात जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.
आता पर्यंत दोन्ही प्रकारच्या पॉलिसी मध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आहे तुम्ही देखील या योजनेत सहभाग घेऊन लाभ घेऊ शकता.
तुम्ही या योजनेची सर्व बिले सादर करून विमा भरपाई घेता येणार आहे.
सविस्तर माहिती बघण्यासाठी बातमी बघा