Rooftop Solar Yojana online application

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे Rooftop Solar Yojana online application रूफटॉप सोलर योजना साठी अर्ज कसा कसा करायचा? कुठे करायचा? आणि या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. पात्रता काय आहे.

अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या लेखामद्धे बघणार आहोत. चला तर मग बघूया.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

Rooftop Solar Yojana थोडीशी माहिती

राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आणि नेट मीटरिंगचे शुल्कही संबंधित वितरण कंपनीने निर्धारित केलेले आहे. याशिवाय अनुदान प्राप्त करण्यासाठी कोणत्याही विक्रेत्याला किंवा वितरण कंपनीला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

मंत्रालयाकडून अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल असेही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे.

आणखी कामाची योजना Salokha Yojana Maharashtra सलोखा योजना महाराष्ट्र सुरू GR जाहीर

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.

लाभार्थीचे नाव

खाते क्रमांक

बँकेचे नाव

IFS कोड           

रद्द केलेल्या चेकची प्रत पोर्टलवर अपलोड करायची आहे.

रूफटॉप सोलर योजना ऑनलाईन अर्ज

 • roof top solar असा कीवर्ड तुमच्या गुगलमध्ये सर्च करा.
 • National portal for rooftop solar अशी लिंक तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल त्यावर क्लिक करा.
 • आता National portal for rooftop solar ची वेबसाईट तुमच्या कॉम्प्युटरवर दिसेल. या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक म्हणजे register here व दुसरा Login here.
 • register here या पर्यायावर क्लिक करून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता. State Distribution company व consumer account number इत्यादी माहिती टाकावी.
 • दुसऱ्या टप्प्यामध्ये मोबाईल नंबर टाकावा आणि send otp on Sandesh app या पर्यायावर क्लिक करा.
 • जर otp दिलेल्या मोबाईल नंबरवर येण्यास काही अडचण येत असेल तर Sandesh app तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल करून घ्या.
 • मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीमध्ये टाकून email आयडी टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
 • वरील सर्व प्रोसेस पूर्ण केल्यावर तुमच्या इमेल आयडीवर एक इमेल येईल ज्यावर क्लिक करून अर्जदाराला त्याचे खाते सक्रीय करायचे आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

तुमचे अकाऊंट ॲक्टिव्ह झाले आहे म्हणजेच सक्रीय झालेले आहे. आता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करा.

 • Apply for roof top solar साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Registered consumer account number टाकायचा आहे. हा नंबर म्हजेच तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलावर असतो.
 • registered mobile number टाका.
 • मोबाईलवर किंवा ईमेलवर आलेला otpटाका आणि लॉगीन करा.
 • Apply for roof top solar असा संदेश दिसेल त्याखाली simplified procedure संदर्भातील सूचना सविस्तर वाचून घ्या. अर्ज करण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि proceed असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे.

रूफटॉप सोलर योजनेसाठी तीन टप्प्यांमध्ये अर्ज सादर करायचा आहे. पहिला टप्पा म्हणजे अर्जाचे तपशील म्हणजेच application details. दुसरा टप्पा म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे Upload documents तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे final submission.

 • Discom Details खालील माहिती भरावयाची आहे
 • Division name of DisCom या रकान्यामध्ये तुमचा विभाग निवडा. हा विभाग तुमच्या लाईटबिलवर दिलेला असतो.
 • subdivision name.
 • Consumer Account Number.
 • Sanctioned load in KW हा लोड लाईटबिलवर तुम्हाला बघावयास मिळेल तो लोड दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
 • Type of connection तुमची कनेक्शनचा प्रकार दिलेल्या पर्यायामधून निवडा.

Solar roof top details मध्ये खालील माहिती टाका.

 • कॅटेगरीमध्ये residential हा पर्याय निवडा. या ठिकाणी Solar roof top calculator देखील दिलेला आहे त्याचा उपयोग देखील तुम्ही करू शकता.
 • Proposed solar plant capacity मध्ये उदारणार्थ १ किलोवॅट टाका.
 • सिंगल फेस हा पर्याय Proposed type of solar connection साठी निवडा.
 • Details of applicant म्हणजेच अर्जदाराचे तपशील संदर्भात माहिती.
 • Full name of premises owner person म्हणजेच ज्या परिसरामध्ये सोलर प्लांट उभारला जाणार आहे त्या परिसराच्या मालकाचे नाव टाका.
 • category of applicant या पर्यायामध्ये अर्जदार ज्या जात प्रवर्गातील असेल तो जात प्रवर्ग निवडावा जसे की ST,ST,OBC,General,Other.
 • ज्या परिसरात रूफटॉप सोलर उभारायचा असेल त्या परिसराचा पत्ता टाका.
 • पिन कोड टाका.
 • जागेचा latitude आणि longitude टाका.
 • latitude आणि longitude काढण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हि सर्व माहिती टाकल्यावर save and next या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायची आहेत ती खालीलप्रमाणे आहेत.

 • मागील सहा महिन्याच्या आतील लाईट बिल. अपलोड करण्यासाठी फाईल साईज जास्तीत जास्त 500KB असावी.
 • ज्या ठिकाणी रूफटॉप सोलर उभारायचा आहे त्या जागेचे प्रुफ. फाईल अपलोड करण्याची साईज 2MB
 • अधिकचे कागदपत्रे देखील तुम्ही अपलोड करू शकता.

कागदपत्रे यशस्वीरित्या अपलोड केल्यानंतर Final submission या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या. जसे तुम्ही अर्ज सादर कराल त्यावेळी Your application has been submitted successfully असा संदेश येईल. म्हणजेच आता तुमचा अर्ज सादर झालेला आहे.

ऑनलाइन अर्ज लिंक

Leave a comment