नमस्कार मित्रांनो आज आपण Grow Soyabin Rate सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.
कापसासह सोयबीन पिकांची शेतकरी बांधवानी मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवलेली आहे.
सध्या सोयाबीन व कापूस अशा दोन्ही पिकास शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला बाजार भाव मिळत नाही.
यामुळे शेतकरी बांधवानी सोयाबीन आणि कापूस पिक सध्या तरी विक्रीस काढलेले नाही, परिणामी बाजारामध्ये सोयाबीन व कापसाची कमी प्रमाणात आवक आहे.
Grow Soyabin Rate सुरुवातीला मिळाला ६ हजार भाव.
सोयाबीनचे भाव सुरुवातीला 6000 रुपये प्रति क्विंटल मिळालेला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भावात वाढ होईल या आशेने सोयाबीन ही विकलेली नाही घरातच ठेवलेले आहे.
त्यानंतर सोयाबीनच्या मालाचे भाव 600 रुपयांनी घसरले त्यामुळे सोयाबीनचे भाव वाढतील अशा आशेवर शेतकरी बांधव आहेत.
परदेशातीन केंद्र सरकारद्वारे सोयाबीनच्या तेलावर आयात शुल्क लावण्याची शक्यता असल्याने सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नवीन अशा निर्माण झालेली आहे.
अशीच काहीशी परिस्थिती कापसाची देखील झालेली आहे. सोयाबीनप्रमाणे कापूस देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवानी साठवून ठेवलेला आहे. शेतकरी बांधवाना इतरांची देणी देणे आहे.
सध्या शेतमाल शेतामध्ये साठवून ठेवल्याने शेतकरी बांधवाना इतरांची देणी देणे असल्याने पुढील काही दिवसात माल विकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
त्यामुळे लवकरच शेतमालास भाव मिळणे आवश्यक आहे नसता हव्या त्या भावास माल विकावा लागणार आहे.
सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता
भाववाढीच्या आशेने अनेक शेतकरी बांधवानी त्यांचा शेतमाल अद्याप विकलेला नाही. परंतु आता शेतकरी बांधवांसाठी काहीसी आनंदाची बातमी आली आहे.
सध्या सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.
मात्र १ एप्रिल पासून केंद्र शासन विदेशातून आयात होणाऱ्या तेलावर आयात शुल्क लागू करण्याची शक्यता असल्याने
सोयाबीन तेलाची आवक कमी होऊन बाजारातील सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतात सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणत वाढले आहे.
देशात सोयाबीनचे उत्पादन वाढले असून सोयाबीन तेलाचे उत्पादनही कमी आहे.
अधिक महितीसाठी बातमी वाचा