Cotton Rate Grow Again कपासचे भाव पुन्हा वाढणार

Cotton Rate Grow Again नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामद्धे बघणार आहोत की कपासचे भाव वाढणार आहे का नाही. मित्रांनो सुरूवातीला कापसाने खूप मोठा उचांक गाठला होता. पण आता कापसाचा भाव बर्‍यापैकी घसरला आहे.

सध्या कापसाल सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये येवढा दर मिळतोय. म्हणजेच दरात खूप प्रमाणात घाट झालेली आहे.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

Cotton Rate Grow Again कापूस ८५०० रुपयांपेक्षा कमी दरात विकू नये

सध्या कापूस दर काहीसे कमी झाले तरी कापसाच्या दरात जास्त नरमाईची शक्यता नाही.

तर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते. यंदा कापसाला चांगला दर मिळू शकतो.

त्यामुळं शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये. तसंच मार्च महिन्यापर्यंत कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.

कापूस दर ९ हजार रुपयांच्या पुढे गेल्यानंतर शेतकरी कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकतात, असं आवाहनही कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

आणखी कामाची माहिती Grow Soyabin Rate सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता

कापसचे भाव परत वाढणार

कापसाचे भाव नरमल्याने दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यातच सध्या बाजारातील आवक जास्त असून दर वाढणार नाहीत,

कापूस दरात आणखी घसरण होईल, अशा अफवाही काहीजण पसरवत आहेत.

पण जाणकारांच्या मते, कापूस दरात जास्त घसरण होणार नाही. पुढील आठवडाभरानंतर कापूस दरात सुधारणा दिसू शकते,

असा अंदाज शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी यंदा कापूस विक्री मर्यादीत ठेवली. त्यामुळं बाजारात आवक वाढली नाही. परिणामी शेतकऱ्यांकडून यंदा कमी भावात कापूस काढता आला नाही.

कापसाचे भाव टिकून आहेत. बाजारात कापूस दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रीही कमी केली. त्यामुळं दर पुन्हा वाढत आहेत.

अधिक महितीसाठी बातमी बघा

सध्या बाजारात अफवा असली तरी कापसाचे भाव पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी विक्री मर्यादीत ठेवल्यास कापसाचे दरही टिकून राहतील.

त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारातील अफवांना बळू पडू नये, असं आवाहन जाणकारांनी केलंय. यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला त्यामुळं कापसाचे भाव टिकून आहेत, असं काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी एका मुलाखतीत म्हटलंय.

Leave a comment