नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. कधी अवकाळी पासामुळे, पाऊस कमी पडल्यामुळे अशाप्रकारे भरपूर कारणे असतात. मित्रांनो या शेतकऱ्यांची मदत म्हणून शासन अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी वितरीत करत असते.
शासनाने जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी निधी वितरीत केला असल्याचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर काल म्हणजे ७ मार्च ला प्रकाशित करण्यात आलेला आहे. हा जी. आर तुम्हाला या लेखाच्या सर्वात शेवटी pdf स्वरुपात दिलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता.
अतिवृष्टी नुकसान भरपाई वाढीव निधी होणार शेतकऱ्याच्या खात्यात जमा
अतिवृष्टी नुकसान वाढीव निधी लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. शेती पिकाच्या झालेल्या नुकसानभरपाई पोटी वाढीव रेटने एकशे पंचवीस कोटी सात लाख एक हजार एवढा निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
मित्रांनो शेतकऱ्यांना खूप काही नैसर्गिक आपत्तींचा समान करावा लागतो. या आपत्तीमुळे शेतकरी बांधव खूप आर्थिक संकटात पडतो याच संकटाला मदत म्हणून शासन काही निधी शेतकऱ्यांना वितरीत करत असते. हा अतिवृष्टी नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हि शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे.
आणखी कामाची योजना PM kisan Ekyc करणे आवश्यक नाहीतर मिळणार नाही मोदीचे पैसे
बघा तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी आला
कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे याचे संपूर्ण तपशील वरील जीआर सोबत दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यासाठी नेमका किती निधी मिळणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अगदी सोपे होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना हि मदत दिली जाणार आहे त्या शेतकऱ्यांचे सर्व तपशील संबधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्द केले जाणार आहेत. त्यामुळे त्या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही या संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकता कि कोणत्या शेतकऱ्यास पिक नुकसान भरपाईपोटी किती निधी मिळालेला आहे.या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी वितरीत करण्यात आला आहे ह्या सर्व बाबींची नोंद केलेली आहे
शासन निर्णय बघण्यासाठी खालील शासन निर्णय या बटनावर क्लिक करा
मित्रांनो विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या groups मध्ये सामील व्हा किंवा 9096197462 हा नंबर तुमच्या group मध्ये सामील करा