Crop Damage नांदेड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव भरपाई मिळणार आहे.
या अवकाळी पावसामुळे तीन हजार ७५८ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता त्यामुळे कापूस,तूर, ज्वारी, हरभरा, व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
यामध्ये नायगाव, अर्धापूर, व भोकरमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याने प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी ५ कोटी ५१ लाख रुपयाची मागणी केली आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये या वर्षी जुलै व ऑगस्ट मोठ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीपातील पिकांना मोठा फटका बसला आहे.
त्यांतर पुन्हा नोव्हेंबर मध्ये २७, २८, २९ या तारखेला १५ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली यामध्ये केळी, पपईच्या बागा आडव्या झाल्या त्यासह अनेक पिकाचे मोठे नुकसान झाले. Crop Damage
यामध्ये कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी यांच्याकडून पंचनामे करण्यात आले.
या भागामध्ये तीन हजार ७५८ हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले आहे गारपीटमुळे जिरायती, बागायत व फळपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
तीन हेक्टर पर्यंत मिळणार वाढीव मदत
नांदेड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांना वाढीव मदतनीधीसह तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायती पिकासाठी २७ हजार तर फळपिकासाठी ३६ हजार रुपये मिळणार आहेत.