या जिल्ह्यात ६१ हजार शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार, पण उर्वरित 14 हजारांची वाटचाल अडकली Crop Insurance

Crop Insurance नाशिक जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा विचार करता शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम (Crop Insurance) पीकविमा देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ९८ हजार ३७२ शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मंजूर झाला होता. त्यापैकी ७६ हजार ८१३ शेतकऱ्यांची रक्कम संबंधित विभागाकडे प्राप्त झाली असून त्यापैकी ६१ हजार ८२० शेतकऱ्यांना १६ कोटी ७० लाख ८८ हजार रक्कम खात्यावर वर्ग केली आहे.

दिवाळीपूर्वी अग्रिम पीकविमा शेतकऱ्यांना दिला जाणार असे जाहीर करण्यात आले होते. परंतु दिवाळीनंतर तब्बल एका महिन्यानंतर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीकविमा वर्ग करण्याचे काम सुरू झाले. Crop Insurance

दुसरा टप्पा कधी जाहीर होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २ लाख ९९ हजार ४७१ शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अद्यापही वेळ आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच संबंधित विभागाकडे अर्ज करावा.

Leave a comment