नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात कि शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म shauchalay online form कसा भरावा लागतो. कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लगतो.शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म shauchalay online form कसा भरावा लागतो हे जाणून घेण्यापूर्वी अगोदर पुढील माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियान मधून नागरिकांना सौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते.
शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म साठी कोण पात्र असतील
- दारिद्रय रेषेवरील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती.
- दारिद्रय रेषेखालील सर्व कुटुंब.
- लहान आणि अल्पभूधारक शेतकरी.
- भूमिहीन शेतमजूर.
- शारिरीकदृष्ट्या अपंग.
- महिला कुटुंब.
आमच्याशी व्हाट्सअॅप वर कनेक्ट होण्यासाठी येथे टच करा.
शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म साठी खालीलप्रमाणे करा नोंदणी
- पुढील वेब ॲड्रेस तुमच्या कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या ब्राउजरच्या सर्च बार मध्ये सर्च करा https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx किंवा डायरेक्ट पेजवर जाण्यासासाठी येथे क्लिक करा.
- जसे हि तुम्ही वरील वेब ॲड्रेस सर्च कराल त्यावेळी तुमच्या कॉम्पुटरवर त्यावेळी स्वच्छ भारत मिशन फेस २ Swachh Bharat Mission (G) – Phase II चा इंटरफेस तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- या ठिकाणी तुम्हाला Citizens Registration हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- नोंदणी Registration form ओपन होईल त्यामध्ये पुढील माहिती भरा.
- तुमचा सुरु असलेला मोबाईल नंबर टाका.
- तुमचे नाव टाका.
- तुमचे लिंग निवडा.
- तुमचा पत्ता टाईप करा.
- राज्य निवडा.
- दिलेल्या चौकटीमध्ये कॅपचा कोड टाईप करा.
- सबमिट करा.
आणखी कामाची योजना बघा प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज मिळेल १५ ते २० हजारांची आर्थिक मदत
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लॉगीन करा.
- वरील प्रमाणे प्रोसेस पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमची नोंदणी करता येणार आहे.
- पासवर्डसाठी मोबाईलचे शेवटचे चार अंक टाका.
- कॅपचा कोड टाईप करा.
- लॉगीन या बटनावर क्लिक करा.
आणखी हेही वाचा Damini mobile app शेतकऱ्यांना वीज कोसळण्यापूर्वी सूचित करणार
शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म लॉगीन केल्यावर भरावयाची माहिती.
यशस्वी लॉगीन केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा पासवर्ड बदलण्याची सूचना येईल तो बदलून घ्या. स्क्रीनच्या डाव्या बाजूला खालीलप्रमाणे तीन पर्याय दिसतील.
- New Application.
- View Application.
- Change Password.
यापैकी New Application या पर्यायावर क्लिक करा. जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या स्क्रीनवर ऑनलाईन अर्ज ओपन होईल आता तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती त्यामध्ये भरावयाची आहे.
- IHHL Application Form मध्ये खालील माहिती भरा.
- State Name मध्ये महाराष्ट्र निवडा.
- District साठी तुमचा जिल्हा निवडा.
- Block Name या सदरासाठी तुमचा तालुका निवडा.
- दिलेल्या यादीमधून तुमची पंचायत निवडा.
- तुमचे गाव निवडा.
- Select habitation मध्ये तुम्ही जर वाडीवस्तीवर राहत असाल तर ते निवडा किंवा तुमचे गाव निवडा.
ब या सदरासाठी शौचालय मालकाची माहिती Section B Toilet owner’s Particular
- अर्जदाराचे आधार कार्डनुसार नाव टाईप करा.
- आधार नंबर टाका आणि तो पडताळून घ्या.
- वडील किंवा पतीचे नाव टाका.
- अर्जदाराने तो पुरुष आहे किंवा स्त्री आहे तो पर्याय निवडावा.
- पोट जात निवडा.
कार्डाचा पर्याय निवडा. या ठिकाणी तुम्हाला दोन पर्याय दिसतील APL म्हणजेच Above poverty line व BPL म्हणजे Below poverty line. थोडक्यात APL म्हणजे दारिद्र्य रेषेमध्ये नसलेला आणि BPL म्हणजे दारिद्र्य रेषेखालील असलेला. योग्य तो पर्याय निवडा.
- मोबाईल नंबर.
- इमेल आयडी.
- व तुमचा संपूर्ण पत्ता टाईप करा.
- अर्जदाराचे बँकेचे तपशील.
बँकेचे तपशील भरा.
- बँकेचा IFSC कोड टाका.
- जसे हि तुम्ही IFSC कोड टाईप कराल त्यावेळी तुमच्या बँक शाखेचे माहिती आपोपाप खाली आलेली तुम्हाला दिसेल.
- तुमचा बँक खाते क्रमांक टाईप करा. खाते क्रमांक परत एकदा टाईप करून खात्री करून घ्या.
- शेवटी तुमच्या बँक खात्याचे स्कॅन केलेली इमेज अपलोड करा. इमेज अपलोड करतांना लक्षात घ्या कि, साईज केवळ jpg, jpeg, png व pdf format मध्येच असावी. फाईची साईज २०० KB पेक्षा जास्त नसावी.
- सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर Apply या बटनावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही Apply या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमचा अर्ज सादर होईल. Your application submit successfully kindly note the application no. अशी सूचना तुम्हाला दिसेल म्हणजेच तुम्हाला तुमच्या अर्जाचा नंबर प्राप्त होईल जो कि भविष्यामध्ये तुम्हाला गरजेचा असेल.
तुमच्या अर्जाचे स्टेट्स. Online application status
- स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला New Application. View Application. Change Password असे तीन पर्याय दिसतील त्यापैकी View Application या पर्यायावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला सिरीयल नंबर, अर्ज नंबर, अर्ज सादर झाल्याची तारीख, स्थिती, स्थिती तपासा म्हणजेच track status असे पर्याय दिसतील. त्यापैकी track status या पर्यायावर क्लिक करा.
- track status या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला समजेल.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून वैयक्तिक सौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
अधिक महितीसाठी खालील व्हिडिओ बघा