मातोश्री पाणंद रस्ता योजना अंतर्गत मिळणार शेतात जाण्यासाठी

मित्रांनो नुकताच एक जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. तो जी आर आपण काय आहे तो आपण बघणार आहे.तर मित्रांनो हा जी आर असा आहे मातोश्री पाणंद रस्ता योजना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी या योजनेंतर्गत रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. रस्ता निर्माण करण्यासंदर्भातील या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

मातोश्री पाणंद रस्तायोजनेअंतर्गत रस्त्यांची फाळणी अशी केली आहेत

  • शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग.
  • एका गावावरून दुसऱ्या गावी जाणारे रस्ते
  • इतर ग्रामीण रस्ते.

Whatsapp group


मातोश्री पाणंद रस्ता  असा केला जाणार बघा

मातोश्री पाणंद रस्तायोजनेचा ज्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे ती कशी असणार आहे या संबधी शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे यापैकी काही महत्वाच्या बाबी आपण पाहूया

  • चारातील खोडलेली माती आणि मुरुमावर दबाई म्हणजेच रोलर फिरविण्यात येईल.
  • शेत रस्ता किंवा पाणंद रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चर खोदले जाणार आहेत.
  • खोदलेल्या चारातील माती व मुरूम शेत रस्ता किंवा पाणंद रस्त्यावर टाकण्यात येईल.
  • रस्ता निर्माण करत असताना त्या ठिकाणी जर काळी माती लागली असेल तर त्यावर कमीत कमी ३०० एम एम जाडीचा कठीण मुरूम टाकावा लागेल आणि त्यावर पाणी शिंपडून रोलर फिरविला जाईल.
  • पक्का रस्ता करण्यासाठी खडी देखील वापरण्यात येणार आहे. खादीचा आकार ५५ एम एम असावा आणि जाडी एकूण २२५ एमएम असावी.

शेतकरी मित्रांनो या जी आर मध्ये आजून यासरख्या खूप बाबी दिलेल्या आहे त्यासाठी खलील जी आर डाउनलोड करा या बटनावर click करा.

मातोश्री पाणंद रस्ता  योजनेची कामे कोणत्या यंत्राने मार्फत केले जातेते बघा

मातोश्री पाणंद रस्ता  योजना जरी राबविली जाणार आहे तरी तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल कि या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमक्या कोणत्या विभागाला संपर्क साधावा किंवा कोणता विभाग या योजनेची अमलबजावणी करेल. तर खालीलप्रमाणे विभागाप्रमाणे या योजनेची अमलबजावणी केली जाईल.

  • वनविभाग.
  • सार्वजनिक बांधकाम विभाग / उपविभाग.
  • ग्रामपंचायत.
  • जिल्हा परिषद बांधकाम विभाग / उपविभाग.

मातोश्री पाणंद रस्ता या योजनेत ग्रामपंचातची जबाबदारी

  • ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेवून शेतकऱ्यांना समजावून सांगणे व संबधित रस्त्याचे अतिक्रमण दूर करणे.
  • शेतकऱ्याने जर मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत शेतात जाण्यासाठी रस्त्याची मागणी केली तर अशा शेत किंवा पाणंद रस्त्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी हि ग्रामपंचायतवर असणार आहे.
  • जर गाव पातळीवर प्रकरण मिटत नसेल तर अशी प्रकरणे तालुका स्तरीय समितीकडे सादर करावीत आणि त्या समितीच्या निर्देशानुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी.

आणखी हेही वाचा पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी बघा मोबाईलवर


Leave a comment