विहीर अनुदान योजना करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण विहीर अनुदान योजना या योजनेविषयी जाणून घेणार अहोत. मित्रांनो विहीर ही शेतीसाठी खूप गरजेची आहे आणि विहीर करायची म्हणल्यास विहीरीसाठी खूप खर्च येतो त्यामुळे शेतकरी मित्रांची खूप तारामळ होते.

प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतात विहीर असावी म्हणून शासनाने ग्रामीण बघातील शेतकरी बांधवांसाठी विहिरसाठी अनुदान योजना सुरू कली आहे. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि योजनेसाठी कोण पत्र असेल या विषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

विहीर अनुदान योजना पात्रता

  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थ्याने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक असेल.
  • लाभार्थ्याच्या जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक राहील.
  •  वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लक्ष रुपयाच्या मर्यादेत असावी.
  •  लाभार्थीला उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत लाभार्थीची जमिनधारणा (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर मर्यादा आहे) असणे बंधनकारक आहे.

हेही वाचा प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना pdf downlod करा

विहीर अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

  • अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
  • जमिनीचा 7/12 व 8-अ चा उतारा.
  • रु. 1,50,000/- पर्यंतचे तहसीलदार यांचेकडील वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  • 100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
  • लाभार्थी जर अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र.
  • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत) विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला, प्रस्तावित विहीर सर्व्हे नं., नकाशा व चतु:सीमा.
  • पाणी उपलब्धतेचा दाखला.
  • कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र.
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.
  • विहिरीच्या जागेचा फोटो
  • ग्रामसभेचा ठराव.

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता.

  • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र. 
  • लाभार्थ्याला रु. 1,50,000/- पर्यंतचे तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • जमिनीचा 7/12 दाखला व 8 अ उतारा.
  • ग्रामसभेचा ठराव.
  • तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • 100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर लाभार्थीचे बंधपत्र.
  • क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र.
  • ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्या विहिरीचे कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
  • इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
  • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

Also read this ट्रॅक्टर योजनेसाठी १५ कोटीचा निधी मिळणार करा ऑनलाईन अर्ज

विहीर अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

  • सगळ्यात अगोदर तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये टाईप करा mahadbt farmer login
  • जसे हि तुम्ही हा कीवर्ड टाईप कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपले सरकार महाडीबीटी हि वेबसाईट ओपन होईल.
  • युजरनेम व पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • यशस्वीपणे लॉगीन केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक Dashboard दिसेल.
  • या ठिकाणी अर्ज करा अशी एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.
  • या ठिकाणी विविध योजनाचे पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायसमोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक सूचना तुम्हाला दिसेल अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या घटकांतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या पैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबंधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा. हि सूचना वाचून झाल्यावर ओके या बटनावर क्लिक करा.
  • अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असा एक form तुमच्या स्क्रीनवर दिसेल याठिकाणी खालील माहिती भरावी लागेल.

विहीर अनुदान योजना इनवेल बोअरसाठी ऑनलाईन अर्ज

  • शेतकऱ्यांचा तालुका निवडा.
  • गाव किंवा शहर.
  • सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक.
  • मुख्यघटक या रकान्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना हा पर्याय निवडा.
  • घटक निवडा या चौकटीवर क्लिक करा. या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी इनवेल बोअर या पर्यायावर क्लिक करा.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिसत असलेल्या अटी व शर्थी या बटनासमोरील दिसत असलेल्या चौकटीमध्ये क्लिक टिक करा.
  • हि माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.

जुनी विहीर दुरुस्ती ऑनलाईन अर्ज

  • या अगोदर ज्या प्रमाणे इनवेल बोअरसाठी अर्ज केला त्याचप्रमाणे जुनी विहीर दुरुस्तीसाठी सुद्धा अर्ज करायचा आहे.
  • दिलेल्या रकान्यामध्ये शेतकऱ्याचा तालुका गाव किंवा शहर सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक या संदर्भातील माहिती टाका.
  • त्यानंतर मुख्यघटक या चौकटीमध्ये अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायाला सिलेक्ट करा.
  • घटक निवडा या चौकटीवर क्लिक करताच या ठिकाणी अनेक योजना तुम्हाला दिसतील त्यापैकी जुनी विहीर दुरुस्ती या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर वरील प्रमाणे नियम व अटी या पर्यायासमोरील चौकटीत टिक करा.
  • जतन करा या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
  • परत पहिल्यासारखीच सूचना दिसेल. आणखी योजनासाठी अर्ज करायचा असेल तर Yes या बटनावर क्लिक करा.

मित्रांनो अजून महितीसाठी आमचा खलील दिलेला व्हिडिओ बघा

व्हिडिओ बघा

अशाच विविध शासकीय अनुदान योजनांची माहिती मिळवण्यसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

5 thoughts on “विहीर अनुदान योजना करा ऑनलाईन अर्ज”

    • Helo sir please approve my Name is balu sakaram bhusare ,at waghla po pokhari ,to Vijapur, dist Aurangabad 2 ekr sheti aahe mala mal ran aahe

      Reply

Leave a comment