बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना म्हणजेच mahabocw scholarship scheme संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा या विषयी आपण संपूर्ण माहिती या लेखामद्धे जाणून घेणार आहोत.

तुम्ही जर बांधकाम कामगार असाल construction worker तर तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ कोणकोणत्या योजना राबवितात या संदर्भात माहिती असायलाच हवी. जेणे करून तुम्ही या योजनांचा लाभ घेवू शकाल.

तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम असाल आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर त्यांना ५ हजार ते १० हजार रुपये अनुदान स्कॉलरशिप म्हणून मिळू शकते.

नोंदणी केली नसेल तर खलील लिंक वर टच करून तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता.

बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे

  • ज्या विद्यार्थ्याचा अर्ज सादर करणार आहात त्याच्या शाळेतील उपस्थिती ७५ टक्के असल्याचे उपस्थिती प्रमाण पत्र.
  • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र Bonafied Certificate.
  • अर्जदाराचे आधार कार्ड.
  • Self Declaration स्वयंघोषणापत्र.
  • राशन कार्ड अपलोड करावे.

कोणत्या इय्यतेसाठी किती पैसे मिळणार

  • बांधकाम कामगारांचे दोन्ही पाल्य शाळेत असतील तर इयत्ता १ ली ते ७ वी साठी प्रत्येक वर्षाला मिळणार २ हजार पाचशे रुपये किंवा ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी ५००० रुपये मिळतील.
  • पाल्य किंवा कामगार यांची पत्नी शिक्षण घेत असे तर अशावेळी त्यांना २०,००० रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते.
  • बांधकाम कामगार यांचा पाल्य किंवा पत्नी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत असेल तर त्यांना प्रतिवर्ष १,००,००० तर अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी ६०,००० एवढे अनुदान मिळेल.

आमच्याशी कनेक्ट व्हा.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

  • तुमच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळाची वेबसाईट ओपन करा. (वेबसाईट –https://mahabocw.in/mr/)
  • वेबसाईट ओपन झाल्यावर construction worker apply online for claim हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक किंवा टच करा.
  • जसे हि तुम्ही वरील सांगितलेल्या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक चौकट तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील New Claim व Update claim त्यापैकी New Claim या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाका ( सुरुवातीला बांधकाम कामगार यांची ऑनलाईन नोंदणी करावी लागते आणि मग रजिस्ट्रेशन नंबर मिळत असतो. )
  • 75 टक्के शाळेची उपस्थितीचे प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्ड, स्वयंमघोषणापत्र व शिधापत्रिका हि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रे पडताळले या बटनावर क्लिक करा आणि सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला एक पोच पवती क्रमांक मिळेल तो पुढील कार्यवाहीसाठी सांभाळून ठेवा.

वरीलप्रमाणे तुम्ही बांधकाम कामगार शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून सादर करू शकता.

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा.

1 thought on “बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना”

Leave a comment