मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र

आजच्या लेखामध्ये मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात कि कशा प्रकारे बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता येवू शकतो. लाभार्थी इय्यता ७ वी उत्तीर्ण असेल तर मिळू शकतात १० लाखापेक्षा आर्थिक सहाय्य मात्र २५ लाखावरील प्रकल्पासाठी १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बेरोजगारांना रोजगार देणे हे शासनासाठी आव्हान झाले आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यामुळे आज आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

आणखी कामाची योजना बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र उद्दिष्ट

पुढील पाच वर्षामध्ये सुमारे १ लक्ष सूक्ष्म व लघु उपक्रम स्थापीत करणे. या उपक्रमाच्या माध्यमातून १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होऊ शकते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे आहे.

 • कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी.
 • वयाची मर्यादा १८ ते ४५ वर्षे ( अनुसूचित जाती/ जमाती / महिला / अपंग / माजी सौनिक यांच्यासाठी ५ वर्षे वयोमर्यादा शिथिल असेल )
 • वैयक्तिक मालकी, भागीदारी व बचत गट ज्यांना वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेली असावी.
 • शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे १) लाभार्थी जर इयत्ता ७ उत्तीर्ण असेल तर १० आणि १० उत्तीर्ण असेल तर २५ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.
 • पती पत्नी पैकी केवळ एकाच कुटुंबातील व्यातीस यात्री रोजगार योजना महाराष्ट्र म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेसाठी आर्थिक सहाय्य खालीलप्रमाणे राहील.

अनुसूचित जाती / जमाती / महिला / अपंग व माजी सैनिक

 • स्वगुंतवणूक ५ टक्के
 • देय अनुदान म्हजेच मर्जीन मनीशहरी २५% ग्रामीण ३५%स्वगुंतवणूक ५ टक्के
 • बँक कर्ज शहरी ७०% ग्रामीण ६०%

उर्वरित प्रवर्ग

 • स्वत: करावी लागणारी गुंतवणूक १०%
 • अनुदान शहरी १५% ग्रामीण २५%
 • बँक कर्ज ७५% ग्रामीण ६५%

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

 • अर्जदार यांचा फोटो.
 • अर्जदाराचा अधिवास दाखला.
 • आधार कार्ड.
 • शाळा सोडल्याचा दाखला.
 • मार्कशीट.
 • पॅन कार्ड.
 • प्रोजेक्ट रिपोर्ट.
 • अर्जदार जात प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला.
 • घोषणापत्र किंवा हमीपत्र.

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.

 • उद्योग संचालनालयाच्या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे क्लिक करा.
 • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईट ओपन होईल.
 • व्यक्तीसाठी ऑनलाईन अर्ज असे एक निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
 • ऑनलाईन अर्ज करा या बटनावर क्लिक करताच अर्ज ओपन होईल या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरून अर्ज सादर करा.
 • अर्ज कसा करावा या संदर्भातील सर्व सूचना ऑनलाईन अर्ज करतांना स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल त्यामुळे हा अर्ज करणे तुमच्यासाठी खूपच सोपे होणार आहे.

अधिक महितीसाठी या योजनेचा जी.आर बघा

Join WhatsApp Group

1 thought on “मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र”

Leave a comment