फवारणी यंत्र योजना 2022

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामद्धे फवारणी यंत्र योजना 2022 या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कोठे आणि कशाप्रकारे करायचा आहे हे येथे आपण बघणार आहे.

शेती क्षेत्र अधिक विकसित करण्यासाठी शासनाकडून (Maharashtra Government) अनेक योजना राबविण्यात येतात. तसेच काही बाबींसाठी अनुदान देखील दिले जाते. जेणेकरून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन घेवू शकेल.

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रराज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषि विभागांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना 2022 पुन्हा एकदा अमलात आणली आहे. तसेच कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे हा या योजनेचा सारांश आहे. शेतकरी बंधुनो त्या कोणत्या योजना आहे ते आपण खाली सविस्तर बघूया.

आणखी कामाची योजना शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सुरु करा अर्ज

फवारणी यंत्र योजना 2022 लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड.
 • बँक पासबूक.
 • पॅन कार्ड.
 • रेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल.
 • जातीचा दाखला.
 •  स्वयं घोषणापत्र.
 • पूर्वसंमती पत्र.
 • ७/१२ उतारा व ८ अ.

फवारणी यंत्र योजना 2022 साठी अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाने

ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. या योजनेचा अचूक अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधुनो तुम्ही तुमच्या गावातील / जवळच्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता.व त्या अर्जाची पोच पावती घेऊ शकता.

किंवा तुम्ही स्वत: जर ऑनलाइन क्षेत्रात हुशार असाल तर Maha- DBT येथे या लिंक वर क्लिक करून या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या, व अर्ज करा.

तसेच तुम्हाला काही शंका असल्यास तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांकडे या योजनेबद्दल चर्चा करा

असा करा ऑनलाइन अर्ज

 • सर्वप्रथम महाडीबीटी (Mahadbt) या पोर्टल वर आपला युजर आयडी पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करायचे आहे.
 • यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील तसेच इतर सर्व माहिती व्यवस्थित भरायची जेणेकरून आपला अर्ज या योजनेसाठी पात्र ठरवला जाईल.
 • यानंतर ‘अर्ज करा’ या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सर्व योजनांची माहिती आपल्याला दिसेल.
 • यातील आपण कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे अवजारे यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी आपल्याला ‘बाबी निवडा’ वरती क्लिक करायचे आहे.
 • यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोरील एक अर्ज उघडेल. आपल्याला मुख्य घटक सर्वात प्रथम निवडायचे आहेत. मुख्य घटकमध्ये कृषी यंत्रे अवजारे खरेदीसाठी अर्थसाह्य यावर क्लिक करा.
 • यानंतर पुढची बाब आहे तपशील. या तपशीलमध्ये आपल्याला ट्रॅक्टर पावर टिलर चलीत अवजारे वर क्लिक करायचे आहे. यानंतर एचपी श्रेणी निवडा.
 • यानंतर यंत्रसामुग्री अवजारे उपकरणे निवडा. यातून पीक संरक्षण अवजारे संरक्षण अवजारे हा ऑप्शन निवडा.
 • मशीनचे प्रकार निवडा.
 • यानंतर १) मी पूर्व संमती शिवाय कृषी अवजारांची खरेदी करणार नाही, खरेदी केल्यास मला अनुदानास पात्र राहता येणार नाही याची जाणीव आहे.
 • २) माझ्या कुटुंबातील सदस्याच्या, माझ्या मालकीचा पावर ट्रेलर ट्रॅक्टर आहे. या दोन्ही बाबींवर क्लिक करायचे आहे.
 • यानंतर ‘जतन करा’ यावर क्लिक करायचे आहे.
फवारणी यंत्र योजना 2022
 • यानंतर घटक तपशील यशस्वीरीत्या जोडले आहे. आपल्याला आणखी घटक जोडायचे आहे का? असे दिसेल जर तुम्हाला आणखी काही घटक जोडायचे असेल तर Yes करून जोडू शकता. नाहीतर No करून पुढे जाऊ शकता.
 • यानंतर पुन्हा मुख्यपृष्ठावर आल्यानंतर आपल्याला ‘अर्ज करा’ यावर क्लिक करायचे आहे.
 • यानंतर आपण आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडल्या आहे का याची खात्री करा.
 • यानंतर ‘पहा’ वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या सर्व बाबी दिसतील. यावर आपल्या गरजेनुसार बाबींना प्राधान्यक्रम द्यावा.
 • ‘या योजनेंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या अटी- शर्ती/ मार्गदर्शक सूचना लागू राहतील’ यावर टिक करा.
 • यानंतर अर्ज सादर करा यावर क्लिक करा.
 • क्लिक केल्यानंतर आपण यापूर्वीच या बाबींसाठी पेमेंट केलेलं होतं त्याच्यामुळे आपल्या पेमेंट करण्याचे ऑप्शन येणार नाही, परंतु 2021- 22 साठी अर्ज केलेला नसेल तर नव्याने अर्ज करत असाल तर मात्र आपल्याला डायरेक्टली अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर पेमेंट ऑप्शन दिला जाईल.
 • आपला हा अर्ज पात्र झाल्यास त्यावर काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
 • यानंतर संमतीपत्र दिलं जातं. या आधारे तुम्ही दिलेल्या कोटेशननुसार अवजार खरेदी करून बिल येथे जोडू शकता.
 • यानंतर आपल्याला अनुदानाचा लाभ दिला जाईल.

अशाप्रकारे तुम्ही फवारणी यंत्र योजना 2022 साथी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a comment