शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल न्यायालय म्हणते भू भाडे देण्याचा निर्णय घ्या

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या असतील किंवा त्यांच्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल उभे केले असतील तर त्यासाठी शेतकऱ्यांना भू भाडे मिळू शकते. या संदर्भात बीड जिल्हाधिकारी यांना औरंगाबाद खंड पीठाचे न्यायधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेडणेकरण यांनी हा आदेश दिला आहे.

विना परवानगी महावितरण कंपनीने किंवा कोणत्याही फर्मने शेतकऱ्याच्या शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल उभे केले असतील तर त्यांना यासाठी भाडे मिळू शकेल काय असा प्रश्न निर्माण बऱ्याच शेतकऱ्यांना पडला होता.

आणखी कामाची योजना वैयक्तिक कर्ज योजना 10 लाख मिळेल कर्ज आताच करा अर्ज

तुमच्याही शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल उभे केले आहेत काय

नुकताच औरंगाबाद खंडपीठात एका शेतकऱ्याने भू भाडे देण्या संदर्भात अर्ज दाखल केला होता. त्यावर हि सुनावणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये महावितरण कंपनीचे विदूत पोल तसेच ट्रान्सफार्मर उभे केले जातात. यासाठी शेतातील काही जागा व्यापली जाते.

शेतातील जागा व्यापली गेल्याने अर्थातच शेतकऱ्यांची उपजावू जमीन व्यापली जाते त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लगते.

शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत खांब, विजेच्या तारा किंवा रोहित्र त्यांची परवानगी घेणे व करार करणे आवश्यक आहे. या संदर्भातील बातमी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

बातमी पहा.

शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल असेल तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायलाच हवी.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात उभे केलेले विद्युत पोल, शेतावरून गेलेल्या विजेच्या तारा तसेच शेतामध्ये बसविलेल्या रोहित्राच्या बदल्यात नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. यासाठी शेतकरी संघटनेचे ॲड.

अजित काळे यांनी शेतकऱ्यांना भू भाडे मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन केले होते.

यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले होते परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती.

या याचिकेस उत्तर म्हणून खंडपीठाने ९० दिवसाच्या आत शेतकऱ्यांना भू भाडे देण्यासंदर्भात निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत.

महावितरण सोबत भू भाडे करार करणे फायद्याचे

महावितरण वीज कंपनी शेतकऱ्यांना वीज बिल वसूल करण्यासाठी नोटीस देते. कधी कधी शेतकऱ्यांची वीज देखील बंद केली जाते.

परंतु महावितरण कंपनी त्यांचे विद्युत जाळे पसरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्यत खांब किंवा रोहित्र बसवितात त्या बदल्यात कुठलाही करार किंवा मोबदला दिला न जाण्याची शक्यता असते.

अशावेळी शेतकरी बांधवानी आपले हक्क आणि वीज वितरण कंपनी संदर्भात माहिती जाणून घेतल्यास नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. तुमच्याही शेतामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पोल आहे का. असेल तर खालील अर्ज नमुना तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो.

भू भाडे मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा

Leave a comment