हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करा

मित्रांनो आज आपण जाणून घेवूयात हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे. आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा Har Ghar Tiranga हे अभियान दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबवणे सुरू आहे.

हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.

आणखी कामाची योजना पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 हजार

हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी खलील पद्धतीचा वापर करा

 • या ठिकाणी तुम्हाला काही ४ स्टेप्स दिसतील वाचून घ्या.
 • Pin a flag असे केशरी रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही Pin a flag या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला तुमच्या मोबाईलचे लोकेशनसाठी परवानगी द्या असा संदेश तुम्हाला दिसेल.
 • जर तुम्ही लोकेशन allow या बटनावर क्लिक केले तर पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचे नाव आणि फोन नंबर टाकण्याची सूचना दिसेल.
 • तुमचे नाव आणि फोन नंबर टाईप केल्यावर Next या बटनावर क्लिक करा.
 • जसे तुम्ही Next या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते लोकेशन ट्रेस केले जाईल त्यानंतर Pin a flag या बटनावर क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही Pin a flag या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला Congratulations Your flag has been pinned असा संदेश दिसेल. त्या खाली download certificate अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
 • जसे हि तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी हे प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकाल.

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा

तिरंगा अभियान साजरी करताना खलील नियमांचे पालन करा.

 • ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.
 • ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 • तिरंगी ध्वजाचा आकार आयताकार असावा.
 • झेंड्याची लांबी – रुंदीचे प्रमाण ३ X २ असावे.
 • कातलेल्या, विणलेल्या, मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क किंवा खादीपासून बनविलेल्या कपड्याचा ध्वज असावा.
 • अर्धा तुटलेला, फाटलेला, मळलेला राष्ट्र ध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावू नये.
 • कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकावल्यास ध्वज संहिता पाळावी. ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवावा.
 • घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.
 • राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एकाच काठीवर फडकावू नये.
 • ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा.

Leave a comment