गणेश मंडळ पुरस्कार मिळणार ५ लाख रु असा करा अर्ज

मित्रांनो नमस्कार या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार मिळणार आहे त्यामुळे राज्यातील गणेश मंडळे या वर्षी मालमाल होणार आहे.

गणेश उत्सव म्हंटला की एक वेगळाच आनंदाच आहे महाराष्ट्रातील अनेक भागात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

या वर्षी गणेश उत्सव निमित्त गणेश उत्कृष्ट गणेश मंडळांना शासनाच्या वतीने बक्षीस वितरण केले जाणार आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना हा पुरस्कार देण्याचे योजले आहे.

त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या गावामध्ये सार्वजनिक गणपती बसवला असेल तर तुम्ही सुद्धा या पुरस्कार योजनेचा लाभ घेता येणार आहे.

गणेश मंडळ पुरस्कार ५ लखपासून २५ हजारपर्यंत बक्षीस

शासनाच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये ज्या गणेश मंडळाचा पहिला क्रमांक आला त्या मंडळाला ५ लाख बक्षीस मिळणार आहे. दूसरा क्रमांक मिळवणाऱ्या मंडळास २.५० लाख बक्षीस दिले जाणार आहे तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या मंडळास १ लाख बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय गणेश मंडळाला प्रमाणपत्र सुद्धा वाटप केले जाणार आहे.

मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या स्पर्धेमध्ये भाग कसा घ्यावा व त्यासाठी अर्ज कसा करावा तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर नोंदणी करावी लागते.

या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी गणेश मंडळाला www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे

या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी गणेश मंडळाने ३० ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अर्ज नमूना देखील वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हा अर्ज तुम्हाला डाउनलोड करावा लागणार आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून पूर्ण भरलेला अर्ज तुम्हाला  mahotsav.plda@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावा लागणार आहे.

गणेश मंडळ पुरस्कार निवड पद्धत

या स्पर्धेमधील सहभागी महाराष्ट्रातील तमाम गणेश मंडळाची गुणांकन निकषांच्या आधारे बक्षिसांसाठी निवड करण्यात येईल. एकूण गुण १५० असून कोणत्या बाबीसाठी किती गुण असणार आहेत ते खालीलप्रमाणे.

  गुणसाठी बाबी  व गुणांक

१  पर्यावरण पूरक मूर्ती  – १० गुण

२  पर्यावरणपूरक सजावट ज्यामध्ये थर्माकोल प्लास्टिक इत्यादी साहित्य नसेल असे  –१५ गुण

३  ध्वनी प्रदूषण रहित वातावरण  – ०५ गुण

४  पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा व सजावट केल्यास  – २० गुण

५  स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा किंवा सजावट  – २५ गुण

६  रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबीर इत्यादीसाठी  – १० गुण

७  शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक/आरोग्य/सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य  – १० गुण

८  महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक/आरोग्य/सामाजिक इत्यादीसाठी केलेले कार्य  – १० गुण

९  पारंपारिक व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा  – १० गुण

१०  पारंपारिक व देशी खेळाच्या स्पर्धा  – १० गुण

११  गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदाहरणार्थ पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतूक अडथळा येणार आहे या बाबतीतील नियोजन आयोजनातील शिस्त इत्यादीसाठी  – २५ गुण

पुरस्कारासाठी अर्जामध्ये भरावयाची माहिती

 • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव अर्जामध्ये व्यवस्थित लिहावे.
 • त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांची नावे, मोबाईल क्रमांक व ई-मेल व्यवस्थित लिहावे.
 • अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष यांची माहिती पत्रव्यवहारचा पूर्ण पत्ता सविस्तर लिहावा जेणे करून निवड समितीला हा पत्ता शोधण्यास सोपे होईल.
 • उत्सव स्थळ व्यवस्थित लिहावे.
 • धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केल्याबाबतचा तपशील किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची परवानगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतल्याचा तपशील किंवा त्याची प्रत या अर्जासोबत पाठवावी लागणार आहे.
 • स्थापन केली जाणारी गणरायाची मूर्ती पर्यावरण पूरक मूर्ती आहे किंवा नाही असल्यास त्या मूर्तीचा तपशील अर्जामध्ये लिहावा.
 • पर्यावरण पूरक सजावट उदाहरणार्थ थर्माकोल, प्लास्टिक इत्यादी साहित्य विरहित आहे किंवा नाही असल्यास तपशील व्यवस्थित लिहावा.
गणेश मंडळ पुरस्कार
 • ज्या ठिकाणी गणराची स्थापना केली जाणार आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण रहित वातावरण आहे किंवा नाही हे देखील या अर्जामध्ये कळवावे लागणार आहे.
 • गणेशोत्सव दरम्यान पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा सजावट आहे किंवा नाही असेल तर त्या बाबत माहिती द्यावी कोणती संकल्पना आहे त्याचा तपशील द्यावा.
 • स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा सजावट आहे किंवा नाही असल्यास तपशील द्यावा.
 • रक्तदान शिबिर, वैद्यकीय सेवा शिबिर इत्यादी कार्य गणेशोत्सव दरम्यान आयोजित केलेले आहे किंवा नाही असल्यास त्या संदर्भात तपशील अर्जामध्ये द्यावा.
 • गणेशोत्सव दरम्यान शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक आरोग्य सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य असल्यास त्या संदर्भात अर्जामध्ये तपशील द्यावा.
 • महिला ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक आरोग्य सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य असल्यास तपशील द्यावा.
 • गणेशोत्सव दरम्यान पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत किंवा नाहीत पारंपारिक देशी खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत किंवा नाहीत असल्यास माहिती लिहावी.
 • गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदाहरणार्थ पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतूक अडथळा येणार आहे या बाबतीतील नियोजन शिस्त इत्यादी अन्य काही माहिती द्यायची असल्यास ती या अर्जामध्ये लिहायची आहे.

अर्ज नमूना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a comment