नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5 दिवसात रक्कम जमा होणार

शेतकर्‍यांसाठी खुशखबर ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्या शेतकर्‍यांच्या खात्यात पाच दिवसात रक्कम जमा होणार. दिनांक १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी धारणी तालुक्यातील साद्राबाडी या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.

५ दिवसाच्या आतमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा मोफत निर्धूर चूल योजना अर्ज सुरु 2022 असा करा ऑनलाईन अर्ज

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच दिवसात रक्कम जमा होणार असल्याने शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानभरपाई कधी मिळते याकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागून राहिलेले आहे. अशातच ५ दिवसाच्या आत शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई मिळणार असल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे.

शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शासनाच्या या मदतीमुळे शेतकरी बांधवांच्या नुकसानीची संपूर्ण भरपाई तर होणार नाही मात्र खूप मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे हि रक्कम लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी अशा करूयात.

Leave a comment