पिक नुकसानभरपाई 2022 बँकेत जमा होण्यास सुरुवात

नमस्कार शेतकरी बंधूंनो पिक नुकसानभरपाई 2022 बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हि नुकसानभरपाई कशी मिळत आहे आणि किती मिळत आहे हेच या ठिकाणी आपण जणू घेणार आहोत. शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून या नुकसानीची पाहणी करण्यात आली होती शिवाय पंचनामे देखील करण्यात आले होते.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्याज प्रमाणात नुकसान झाले होते त्यांना पिक नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्याची घोषणा शासनाच्या वतीने करण्यात आलेली होती.

आता हि नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि नुकसानभरपाई जमा होत आहे. याचे एक ताजे उदाहरण आम्ही तुम्हाला या ठिकाणी देत आहोत.

पुढील योजना बघा मोफत निर्धूर चूल योजना अर्ज सुरु 2022 असा करा ऑनलाईन अर्ज

पिक नुकसानभरपाई 2022

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने पैसे जमा होत आहेत हे तर आपण जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी नुकसानभरपाई संदर्भात शासनाचे नेमके धोरंज काय आहे ते जाणून घेवूयात.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या वर्षी अतिवृष्टी आणिज पुराचा खूप मोठा फटका बसला परिणामी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.

या नुकसानभरपाईसाठी शासनाने गुरुवारी सायंकाळी म्हणजेच ८ ऑगस्ट २०२२ रोजी १ हजार ८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

शासनाने जाहीर केलेली हि मदत औरंगाबाद विभागातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.

बातमी बघा.

तीन टप्प्यामध्ये नुकसानभरपाईसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

  • गोगलगाय नुकसान.
  • महाअतिवृष्टी.
  • अतिवृष्टी.

तर वरीलप्रमाणे हि पिक नुकसानभरपाई 2022 मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्याम्धेय जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मदत कशा पद्धतीने जमा होत आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण जाणून घ्यायचे असेल तर खालील व्हिडीओ पहा.

पिक नुकसानभरपाईसाठी निकषामध्ये केला बदल

पिक नुकसानभरपाई 2022 आर्थिक मदत देण्यासाठी यावेळी क्षेत्र मर्यादा वाढवून देण्यात आली होती. आता ज्या शेतकरी बांधवांकडे ३ हेक्टर शेती असेल आणि त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकरी बांधवाना देखील पिक नुकसानभरपाई आर्थिक मदत मिळणार आहे.

हि मदत पूर्वी २ हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिली जात होती ती आता ३ हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिली जाणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

शेतकऱ्यांना दिली जाणारी हि मदत आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचे जर ऑनलाईन बँकिंग असेल तर लगेच तपासून पहा किंवा तुमच्या बँक शाखेला भेट  देवून या मदतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.

1 thought on “पिक नुकसानभरपाई 2022 बँकेत जमा होण्यास सुरुवात”

Leave a comment