प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार मिळणार बिनव्यजी कर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 50 हजार कर्ज दिले जाते त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

केंद्र सरकारने फेरीवाल्याच्या मदतीसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे या योजनेंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याचा अनेक छोट्या व्यवसायकाना फायदा होत आहे.

मित्रांनो तुम्हाला माहितीचा असेल की लॉकडाऊन मुळे अनेक छोटे व्यवसायिक अडचणीत आले होते.

त्यामुळे आशा फेरिवाल्या विक्रेत्याना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

या योजना आंतर्गत सुरुवातीला 10 हजार रुपये त्याची वेळेत परतफेड केल्यानंतर 20 हजार रुपये त्याचीही वेळेत परतफेड केल्यानंतर 50 हजार रुपये बिनब्याजी कर्ज दिले जाते.

आता पर्यंत अनेक व्यवसाय करणाऱ्या लोकानी या योजनेंतर्गत कर्ज घेतले आहे केंद्र शासनाने त्यासाठी आता पर्यंत 21 लाख 29 हजार रुपये कर्जाचे वितरण केले आहे.

आणखी कामाची योजना व्यवसायासाठी मिळणार 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 10 हजारा पासून 50 हजारा पर्यंत मिळणार कर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते तुम्ही घेतलेल्या या कर्जाला कोणत्याही प्रकारचे व्याज आकरले जात नाही.

योजनेतून लाभार्थी यास सुरुवातीला दहा हजार रुपये कर्ज दिले जाते. त्याची नियमित परतफेड केल्यानंतर लाभार्थी यास 20 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

यानंतर तर तुम्ही 20 हजारांची देखील नियमित परतफेड केली तर तुम्ही 50 हजार रुपये कर्ज ही बिनव्याजी उपबद्ध करून दिले जाते.

कोण करू शकतो या योजनेसाठी अर्ज

 • सलून दुकानदार
 • चप्पल शिवणारा
 • पान पट्टी चालक
 • धोबी
 • भजीपला विकणारे
 • फलविक्रेते
 • चहाचा ठेला चालवणारे
 • ब्रेड, भाजी विक्रेते
 • कपडे विकणारे
 • पुस्तके विकणारे
 • हस्तव्यवसाय उत्पादने विकणारे

यापैकी जो व्यवसाय तुम्ही करत असाल तर तुम्हाला केंद्र शासनाकडून 50 हजारापर्यंत बिनव्याजी करून मिळू शकते.

कागदपत्रे काय लागतात ?

 • रहिवाशी प्रमाणपत्र
 • आधार कार्ड
 • मतदार कार्ड
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • बँक पासबूक
 • वरील सर्व कागदपत्रे अर्ज करता वेळेस तुम्हाला सादर करावी लागणार आहे.

असा करा योजनेसाठी अर्ज

या योजनेसाठी अर्ज तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन आशा दोन्ही पद्धतीने करू शकतात.

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीमध्ये जाणून अर्ज करावा लागतो.

तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन देखील अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला PM SVANdhi या वेबसाइट वर अर्ज करावा लागतो.

हा अर्ज तुम्ही csc सेंटरवर जाणून त्यांच्या मदतीने करू शकता आणि 50 हजारापर्यंत कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता.

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment