पीएम किसान 13 वा हफ्ता मिळवायचा असेल तर करा हे काम

नमस्कार मित्रांनो शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य मिळाव म्हणून केंद्र शासनाने चालू केलेली अति उत्तम योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेमुळे खूप शेतकरी मित्रांचा फायदा झाला आहे. पीएम किसान 13 वा हफ्ता लवकरच मिळणार असल्याची माहिती शासनाने दिलेली आहे. ती माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

या योजनेद्वारे शासन शेतकर्‍यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये याप्रमाणे वार्षिक 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य देत असते.

आणखी कामाची योजना Salokha Yojana Maharashtra सलोखा योजना महाराष्ट्र सुरू GR जाहीर

पीएम किसान 13 वा हफ्ता मिळवायचा असेल तर करा आधार लिंक

मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक लाभार्थ्यांना EKYC करणे हे सक्तीचे केले आहे. तरी सर्व लाभार्थी शेतकर्‍यांनी ekyc करणे गरजेचे आहे. तुम्ही अजूनही ekyc केली नसेल तर करण्यासाठी येथे क्लिक करा.

आणि त्याचबरोबर आपल्या बँक खात्याशी आधार लिंक करणे गरजेचे आहे.

मित्रांनो तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही हे बघण्यासाठी खलील पद्धतीचा वापर करा.

Aadhar Bank Linking Status असे करा चेक

  • Aadhar Bank Linking Status चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. अधिकृत वेबसाइट – https://resident.uidai.gov.in/bank-mapper
  • आधारची वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात वरील टॅब मध्ये “My Aadhar” या ऑप्शनवर क्लिक करा.
  • “My Aadhar” या ऑप्शनवर क्लिक केल्यावर “Aadhar Services” या पर्यायाखाली 6 व्या क्रमांकावर “Check Aadhar Bank Linking Status” हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे.
  • “Check Aadhar Bank Linking Status” ह्या ऑप्शन वर क्लिक केल्यावर आता नवीन टॅब ओपन होईल. आणि या पेजवर आता तुम्ही तुमचे Aadhar Bank Linking Status चेक करू शकता.
  • सर्वप्रथम जिथे आधार क्रमांक नमूद करण्यास सांगितले आहे. तिथे तुमचा आधार क्रमांक अचूकरीत्या टाकून घ्यावा.
  • आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढे दिलेला Captcha Code टाकून घ्यावा आणि Send OTP या ऑप्शन वर क्लिक करावे.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी नमूद करावा.
  • Submit OTP या पर्यायावर क्लिक केल्यावर आता तुमचे Aadhar Bank Linking Status या ठिकाणी दाखवण्यात येईल.
  • तुमचे Bank Seeding Status, Bank Seeding Date आणि Bank हा सर्व तपशील या ठिकाणी दाखवण्यात येईल.

अश्या प्रकारे तुम्ही तुमचे आधार लिंक स्टेटस बघू शकता.

आमच्या योजना कामाची ग्रुप मध्ये सामील व्हा.

Leave a comment