Salokha Yojana Maharashtra सलोखा योजना महाराष्ट्र सुरू GR जाहीर

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे Salokha Yojana Maharashtra  या योजने संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्या महाराष्ट्र राज्यात भाऊ बंदकीचे वाद मिटवणारी, जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित भांडण, तंटे मिटवणारी तसेच वर्षापासून प्रलंबित असलेले जमिनीचे वाद सोडवणारी महत्वपूर्ण अशी सलोखा योजना महाराष्ट्र ही आपल्या राज्यात सुरु करण्यात आलेली आहे.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

Salokha Yojana Maharashtra सलोखा योजना पात्रता तसेच नियम

  • सलोखा योजनेअंतर्गत तुमच्या जमिनीचा पंचनामा करण्याकरिता मंडळ अधिकारी तसेच तलाठी प्रत्यक्ष सर्वे करताना तुमच्या जमिनीवर हजर राहतील.
  • Salokha Yojana अंतर्गत पंचनामा करण्याकरिता तलाठी यांच्याकडे अर्ज करायचा.
  • सलोखा योजने अंतर्गत अंतर्गत कोणत्याही प्रकरणाच्या निकालाकरिता तलाठी यांच्याकडे
  • अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या कार्यालयीन वेळेत तुमच्या जमिनीचा पंचनामा तलाठी यांना करावा लागेल.
  • सलोखा योजना अंतर्गत तुमचे समाधान न झाल्यास तुम्ही उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागु शकतात.

सलोखा योजनेचे फायदे

  • जमिनीच्या वादामुळे मतभेद असलेल्या कुटुंबातील जमिनीशी संबंधित वाद मिटल्यास मतभेद दूर होईल.
  • जमिनीशी संबंधित अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली लागतील.
  • जमिनीच्या वादामुळे कुटुंबात आलेली कटुता दूर होईल.
  • अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.
  • भू माफियांचा शिरकाव तसेच हस्तक्षेप होणार नाही.

मित्रांनो या योजनेच्या अधिक महितीसाठी या योजनेचा जी आर वाचा जी आर बघण्यासाठी खलील जी आर बघा या बटनावर क्लिक करा.

सलोखा योजना महाराष्ट्र अटी व शर्ती

  • सलोखा योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे शेत जमिनीशी संबंधित प्रकरणे सोडविण्यासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत ही दोन वर्ष लागू असेल. शासन निर्णय लागू झाल्याच्या तारखेपासून.
  • जर शेत जमिनीच्या ताब्या संदर्भात प्रकरण असेल तर जमिनीचा ताबा हा किमान 12 वर्षापासून असला पाहिजे.
  • अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही.
  • Salokha Yojana अंमलात येण्यापुर्वीच अशा प्रकारच्या प्रकरणासाठी जर शेतकऱ्याने मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर ते परत मिळणार नाही. केवळ या योजनेअंतर्गत प्रकरणे मुद्रांक शुल्क सवलतीस पात्र असतील.
  • दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित झालेली असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील.

आणखी कामाची योजना अहिल्याबाई होळकर शेळी योजना अर्ज करण्याची तारीख वाढली

Leave a comment