गायीसाठी 70 हजार आणि म्हशीसाठी 80 हजार मिळणार

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखामद्धे बघणार आहोत दुधाळ गायीसाठी 70 हजार तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

त्यासाठी 1 एप्रिल पासून ही योजना लागू करण्यात येत आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

या योजनामद्धे जे काही लाभार्थी चालू वर्षातील आहे त्यांना जुनेच दर मिळणार आहे परंतु नवीन वर्षातील लाभार्थीना हे अनुदान वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन असणार आहे. ही योजना अजून सुरू झालेली नाही आपण 1 एप्रिल पासून अर्ज करू शकाल.

आणखी कामाची योजना गाळयुक्त शिवार योजना आता मागेल त्याला गाळ

गायीसाठी 70 हजार व म्हशीसाठी मिळणार अनुदान

आपल्या महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना मिळावी म्हणून दुधाळ जनावरांचे गट वाटपाच्या राज्यस्तरीय तसेच

जिल्हा वार्षिक योजनेतील प्रती दुधाळ गायीसाठी 70 हजार रुपये, म्हशीसाठी 80 हजार रुपये खरेदी किमतीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

या सुधारित किमतीनुसार योजनेची अंबलबाजावणी आर्थिक वर्ष एप्रिल 2023-24 पासून सुरू होणार आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नविण्यापूर्व योजना

तसेच जिल्हा वर्षीक योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीना दुधाळ जनवारांचे गट वाटप केले जाते.

कोणत्या लभार्थीला किती अनुदान मिळणार

पशुसंवर्धन विभागाच्या या जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गटाच्या अनुसूचित जातीच्या लभार्थीला 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

तर नविण्यापूर्व खुल्या प्रवर्गातील लाभार्थीना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे अनुसूचित जातीच्या लभार्थीला 75 टक्के अनुदान आहे.

2011 पासून गायी म्हशीचे दर 40 हजार रुपये होते विशेष गटाच्या लभार्थीला 75 टक्के तर अन्य गटाच्या लभार्थीला 50 टक्के सबसिडी होती.

बाजारातील प्रचलित दर व नागरिकांची मागणी लक्षात घेऊन शासनाने दुधाळ गायीसाठी 70 हजार तर म्हशीसाठी 80 हजार रुपये खरेदी किमतीचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे मोठ्या रक्कमेच्या अनुदानाचा लाभ संबधित पशुपलकांना होणार आहे सुधारित दर पुढील आर्थिक वर्षात लागू असतील.

अधिक माहितीसाठी बातमी पहा

असा करा ऑनलाइन अर्ज

योजनेला लाभ घेणीसाठी शासनाच्या अधिकृत असलेल्या https://ah.mahabms.com/ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

सध्या 2022-23 या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहे तर जनवारांचे सुधारित दाराबाबतची योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे.

अशाच विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी खाली क्लिक करा.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

Leave a comment