पन्नास हजार अनुदान तिसऱ्या टप्प्याचा निधी लवकरच जमा होणार

नमस्कार शेतकरी बंधूंनो पन्नास हजार अनुदान चा तिसऱ्या टप्प्याचा निधी आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यातील अनेक शेकऱ्यांनी आतापर्यंत 50 हजार अनुदान चा लाभ घेतलेला आहे तर काही शेतकऱ्यांना अजून देखील 50 हजार मिळालेले नाही.

आशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्या टप्प्यातील निधी संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी. आर देखील काढलेला आहे ज्या शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्याच्या निधीची उसुकता लागलेली होती त्यांच्यासाठी ही यंदाची बातमी आहे.

आणखी कामाची माहिती ठिबक अनुदान योजना 90 टक्के मिळणर अनुदान करा अर्ज

पन्नास हजार अनुदान शेतकऱ्यांना ई केवयासी करावे तरच मिळणार अनुदान

प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी करावी या संदर्भात शासनाच्या वतीने अनेक वेळा आवाहन करण्यात आले आहे.

त्यासाठी शासनाने अनेक वेळा मुदतवाढ देखील दिलेली होती.

अद्याप काही शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यामुळे ते शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहील

ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनी ते तातडीने करून घ्यावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

50 हजार अनुदान शेतकऱ्यांना लवकरच मिळणार

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जात आहे.

आतापर्यंत राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

शासनाच्या पोर्टलावर विविध बँकानी अपलोड केलेली शेतकऱ्यांची एकूण चार हजार 828 खाती आहेत.

या शेतकऱ्यांच्या कर्ज खत्याला एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे 45 शेतकऱ्यांची बँक खाती आधार ई केवायसी करणे अजून प्रलंबित आहे.

ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव आहे आशा शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे ई केवायसी केली तरच या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळील csc सेंटरवर जाऊन ई केवायसी करून घ्यावी.

अधिक महितीसाठी बातमी वाचा

तिसऱ्या टप्प्याचा निधी लवकरच मिळणार

प्रोत्साहनपर अनुदानसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आलेली होती त्यातील 1 हजार 932 शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटी 60 लाख वर्ग करण्यात आले आहे.

पण मात्र काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांची रक्कम प्रलंबित करण्यात आलेली आहे.

आता तिसऱ्या टप्प्यासाठी जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

त्यामुळे तिसऱ्या टप्प्यासाठी तीन दिवसात निधी प्राप्त होणार असल्याची माहिती सहायक निबंधक कार्यालयातून देण्यात आली आहे.

Leave a comment