Farm Pond scheme शेततळ्यासाठी मिळणार 75 हजार अनुदान

Farm Pond scheme नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी 75 हजार अनुदान मिळणार आहे त्यासाठी शासनाकडून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कृषि सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्यात आला आहे.

शेततळ्याच्या अनुदान रक्कमेत 50 टक्के वाढ करून ती 75 हजार करण्यात आली आहे ऑनलाईन सोडतीद्वारे लाभार्थीची निवड करून योजनेची अंबलबजावणी करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

आणखी कामाची योजना गाळयुक्त शिवार योजना आता मागेल त्याला गाळ

Farm Pond scheme शेततळ्यासाठी मिळणार 75 हजार अर्ज करण्याचे आवाहन

शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान दिले जाणार आहे या योजनेंतर्गत विविध आकारामनाच्या शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे.

जिल्ह्यास वैयक्तिक शेततळे बाबी अंतर्गत सर्वसाधारण 590, अनुसूचित जाती 35, अनुसूचित जमाती 5, असे प्रवर्गानुसार 630 शेततळे प्राप्त झाली आहे.

त्यासाठी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या शेततळ्याचे तालुका निहाय वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलावर अर्ज करता येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

  • अर्जदार शेतकाऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेकात्र क्षेत्र असणे आवश्यक आहे .
  • अर्जदराने यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
  • लाभार्थी निवड ही महाडीबीटी पोर्टलवर कृषि विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे केली जाईल.

शेततळ्यामुळे शेतकऱ्यांना होणार जास्त लाभ

राज्यातील बहुतांश जमिनी ह्या कोरडवाहू असून त्या सर्वस्व पावसावर अवलंबून आहे.

सिंचन सुविधेअभावी पिकाच्या उत्पन्नात मोठ्याप्रमाणात घट येते अथवा पाण्याचा खूप जास्त तान पडल्यास पिके देखील नष्ट होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसणीला सामोरे जावे लागते.

अनेक वेळा मोठा पासून पडतो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदीद्वारे वाहून जाणारे पानी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर आशा अन्य सुविधामधून पावसाच्या पाण्याची साठवणूक करू शकता.

या पाण्याची साठवणूक करण्याकरिता शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देण्यासाठी शेततळे हा पर्याय निर्माण करण्यात आला आहे.

शशवंत कृषि सिंचन योजनांतर्गत वैयक्तिक शेततळे घेणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांच्या आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर पीएफएमएस प्रणाली द्वारे वर्ग करण्यात येईल

यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होणार आहे.

अधिक महितीसाठी बातमी वाचा

Leave a comment